Jio भारतातील पहिली अशी टेलीकॉम कंपनी आहे जिने थेट 4G Network पासून सुरुवात केली होती. लाखो लोकांना 4जी नेटवर्कवर घेऊन येणारी Reliance Jio आता देशात 5G services ची तयारी करत आहे. 5जी ट्रायल्स जवळपास पूर्ण झाले आणि येत्या काही दिवसांमध्ये 5G Spectrum auction देखील होईल. सरकारकडून 5जी रोलआउट होताच Jio 5G देखील सुरु होईल आणि रिलायन्स जियो आधीपासून देशात 5G Network साठी तयार आहे. जर तुम्ही देखील जियो सिम वापरत असाल किंवा तुमचा नंबर जियोमध्ये पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर पुढे आम्ही जियो कंपनी 5जी सर्व्हिसेजसाठी किती तयार आहे तसेच 5G च्या क्षेत्रात कंपनी नवीन काय करणार आहे याची माहिती दिली आहे. या लेखात तुम्हाला Jio 5G plans, 5G recharge Price, 5G Internet Speed तसेच 5G launch संबंधित अपडेट्स मिळतील.
Jio 5G कधी होणार लाँच?
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेतेखाली यूनियन कॅबिनेटनं 5G Spectrum auction ला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभागाच्या प्रस्तवावर शिकामोर्तब करत केंद्र सरकारनं 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला हिरवा कंदील दाखवला आहे. हा लिलाव 26 जुलैला होणार असल्याची बातमी आली आहे. या लिलावात 5जी स्पेक्ट्रम पब्लिक आणि इंटरप्राइजेज दोन्हींना देण्यात येईल ज्यात Jio चं नाव अग्रस्थानी आहे.
हा लिलाव 20 वर्षासाठी असेल ज्यात Jio ला मिळणाऱ्या स्पेक्ट्रमवर कंपनी आपली 5G service सुरु करेल. स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यावर 15 ऑगस्टला भारत सरकार 5जी सेवा देशात सुरु करू शकतं आणि असे झाल्यास रिलायन्स जियोचे ग्राहक देशात सर्वप्रथम 5जी नेटवर्क असणारे मोबाईल युजर बनू शकतात, अशी चर्चा आहे. परंतु फोनमध्ये 5जी नेटवर्क येण्यास 2 ते 3 महिन्यांचा कालावधी अजून लागू शकतो.
सर्वप्रथम Jio 5G कुठे सुरु होणार?
5जी स्पेक्ट्रम लिलावात एकूण 72097.85 MHz spectrum चा लिलाव होईल. या ऑक्शनमध्ये 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz तसेच 2300 MHz फ्रीक्वेंसी असलेले लो बँड्स, 3300 MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स तसेच 26 GHz High frequency bands चा समावेश असेल. रिलायन्स जियोनं यातील अनेक बँड्सवर आपली 5जी टेस्टिंग व ट्रायल केलं आहे.
तसेच कंपनीचे माजी चेयरमन Mukesh Ambani यांनी आधीच सांगतील आहे की, जियोनं देशातील जवळपास 1,000 शहरांमध्ये आपलं 5G Infrastructure तयार केलं आहे आणि 5G rollout होताच या शहरांमध्ये 5जी सर्व्हिस देखील सुरु करण्यात येईल. सरकार सर्वप्रथम भारतातील 13 शहरांमध्ये 5जी आणण्याची योजना बनवत आहे. यात Mumbai, Pune, Delhi, Gurugram, Bengaluru, Kolkata, Chandigarh, Jamnagar, Ahmedabad, Chennai, Hyderabad, Lucknowआणि Gandhi Nagar या शहरांचा समावेश आहे.
किती फास्ट असेल Jio 5G?
रिलायन्स जियोच्या सरकारी आकडे पाहता, दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की आगामी 5जी सध्याच्या 4जीपेक्षा 10 पाट जास्त फास्ट असेल. मंत्रालयानुसार, 5G Network वर 20Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळू शकतो. तसेच Reliance Jio च्या 5जी ट्रायल्स पाहता, Jio 5G ची 1Gbps स्पीडवर नेटवर्क टेस्टिंग करण्यात आली आहे. वास्तवात रिलायन्स जियो नेटवर्कवर 420Mbps download speed तसेच 412Mbps upload speed मिळण्याची शक्यता आहे, ज्यात 11ms latency म्हणजे फक्त 11 मायक्रोसेकेंडची लेटेंसी मिळेल.

किती असेल Jio 5G plan price?
Reliance Jio नं सुरुवातीला पूर्णपणे फ्री 4G Data दिला होता. 5जी बाबत असं होणार नाही, परंतु जियो 5जी डेटा प्लॅन फक्त भारतात नव्हे तर जगभरात सर्वात स्वस्त असू शकतात. काउंटरपॉईंट्सच्या रिपोर्टनुसार भारतीय टेलीकॉम कंपन्या जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5G plans च्या किंमती 4G प्लॅन्स इतक्या ठेवू शकतात. तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते भारतातील 5जी डेटा प्राईस ग्लोबल मार्केटच्या तुलनेत खूप कमी असू शकते. सवयीप्रमाणे Jio 5G plan price अन्य कंपन्यांच्या तुलनेत काहीप्रमाणात स्वस्त असेल.
Jio 5G phone येणार का?
रिलायन्स जियोनं तळागाळातल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 4G फिचर फोन JioPhone लाँच केला होता. तसेच गेल्यावरही Jio Phone Next नावाचा स्मार्टफोन देखील बाजारात आणला होता. आता 5जी नेटवर्कसाठी कंपनी 5G smartphone देखील सादर करू शकते. 5जी जियोफोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु भारतातील सर्वात affordable 5G phone कंपनी सादर करू शकते. Jio 5G phone ची किंमत 9,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.
Jio 5G SIM
5G Network साठी सर्व टेलीकॉम कंपन्यांना नवीन सिम कार्ड जारी करावं लागेल, हे नक्की आहे. हे 5G SIM Card सध्याच्या 4जी सिमकार्डपेक्षा वेगळं असू शकतं. बँड्स व फ्रिक्वेंसीच्या सपोर्टच्या माध्यमातून या सिमच्या आर्किटेक्चर्समध्ये काही बदल केले जाऊ शकतात. ज्या जियो युजर्सना 5जी सपोर्ट हवा असेल त्यांना 5G SIM देखील विकत घ्यावं लागेल. मात्र रिलायन्स जियो आपले Jio 5G SIM कार्ड पूर्णपणे मोफत वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही.


















