विवो एस17 सीरीजची दणक्यात एंट्री; तीन दणकट मोबाइल फोन Vivo S17, S17t आणि S17 Pro लाँच

Highlights

  • स्मार्टफोनमध्ये 4एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे
  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 आहे

विवोनं आज आपली नवीन ‘एस’ सीरीज सादर करून तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं Vivo S17, Vivo S17t आणि Vivo S17 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टायलिश डिजाइन आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची माहिती वाचू शकता.

विवो एस17 सीरीजची किंमत

Vivo S17 ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 2499 युआन (जवळपास 29,290 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 2799 युआन (जवळपास 32,900 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 2999 युआन (जवळपास 35,999 रुपये)

Vivo S17 Pro ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 3099 युआन (जवळपास 36,000 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 3299 युआन (जवळपास 38,300 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 3499 युआन (जवळपास 40,500 रुपये)

विवो एस17 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

Vivo S17 Pro

प्रोसेसर : ह्या स्मार्टफोनमध्ये 4एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी610 जीपीयू आहे. वी17 प्रो अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो.

स्क्रीन : ह्या फोनमध्ये 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.78 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. विवोनं हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

सेल्फी कॅमेरा : Vivo S17 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/2.0 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो.

रियर कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/1.98 अपर्चर असेलेल्या 12 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्ससह चालतो.

बॅटरी : विवो एस17 प्रो मध्ये पावर बॅकअपसाठी 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Vivo S17

प्रोसेसर : हा विवो फोन 6एनएम क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 2.5गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 आहे तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे.

स्क्रीन : हा स्मार्टफोन देखील अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेल्या 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो . हा फोन पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी विवो एस17 स्मार्टफोन देखील एफ/2.0 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/1.88 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो एस17 5जी फोन देखील 4,600एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये आला आहे 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालतो.

Vivo S17t

विशेष म्हणजे विवो एस17टी मॉडेलचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स सीरीजच्या वॅनिला मॉडेल एस17 सारखे आहेत. परंतु कंपनीनं ह्याच्या प्रोसेसरमध्ये बदल करून Vivo S17t मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 चिपसेटसह मार्केटमध्ये आणला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली-जी77 जीपीयूला सपोर्ट करतो. विवोनं ह्या मॉडेलची किंमतीत सांगितली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here