वनप्लसला टक्कर देण्यासाठी 50MP च्या धमाकेदार कॅमेऱ्यासह OPPO Reno 8 आणि Reno 8 Pro लाँच

OPPO Reno8 सीरीज भारतात लाँच झाली आहे कंपनीनं या सीरिजमध्ये OPPO Reno 8 आणि OPPO Reno 8 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. जे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart, OPPO च्या ऑफिशियल वेबसाईटसह ऑफलाईन स्टोर्समधून विकत घेता येतील. OPPO Reno8 सीरीजचे स्मार्टफोन्स MediaTek Dimensity प्रोसेसर, 4,500mAh बॅटरी, 80W SUPERVOOC चार्जिंग आणि Android 12 सह सादर करण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी वेगळा MariSilicon X चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO Reno 8 स्पेसिफिकेशन्स

  • 6.43-इंचाचा FHD+ AMOLED (90Hz रिफ्रेश रेट)
  • MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर 12GB पर्यंत रॅम 256GB स्टोरेज
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • 4,500mAh बॅटरी, 80W SUPERVOOC फास्ट चार्ज
  • Android 12 ColorOS 12.1

OPPO Reno8 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी OPPO चा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबतीला 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो.

OPPO Reno8 स्मार्टफोनमध्ये MariSilicon X पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 आहे, सोबत 2MP चा B&W सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP Sony IMX709 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo Reno8 सीरीजच्या या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन फक्त 28 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे.

OPPO Reno 8 Pro स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-इंच Full HD+ AMOLED (120Hz रिफ्रेश रेट)
  • MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर
  • 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 4,500mAh बॅटरी, 80W SUPERVOOC चार्ज
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 बेस्ड ColorOS 12.1

OPPO Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR 10+ ला सपोर्ट करतो. ओप्पोचा हा फोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.

कॅमेरा ऑप्टिक्स पाहता यात MariSilicon X पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, सोबतीला 8MP IMX355 अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2MP OV02B10 मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोनमध्ये 32MP IMX709 कॅमेरा सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो.

OPPO Reno8 सीरीजची किंमत

OPPO Reno8 स्मार्टफोन शिमर गोल्ड आणि शिमर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केले गेले आहेत. याची किंमत 29,999 रुपयांपासून सुरु होते. तर ग्लेज ग्रीन, ग्लेज ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये आलेला OPPO Reno8 Pro स्मार्टफोनचा बेस मॉडेल 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OPPO Reno8 स्मार्टफोनची विक्री ओप्पोच्या ऑफिशियल वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर 25 जुलैपासून तर प्रो व्हेरिएंटची विक्री 19 जुलैपासून सुरु होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here