अजूनही भारतात अनेक लोक वस्त्यांमध्ये वीज पोहोचली नाही, जिथे पोहोचली आहे तिथे देखील चोवीस तास वीज पुरवली जात नाही. वीज कंपन्या नियोजित पावर-कटची माहिती देऊ शकतात, परंतु अचानक झालेल्या पावर कटमुळे महत्वाचं काम राहून जातं. यावर उपाय म्हणून तुम्ही सोलर पावर जेनरेटर (Solar Power Generator) चा विचार करू शकता. SARRVAD Portable Solar Power Generator ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा सोलर द्वारे चार्ज होणारा जेनरेटर आहे, जो तुमच्या घराला प्रकाश देतो. जेव्हा ऊन नसेल तेव्हा तुम्ही विजेचा वापर करून देखील हा जेनरेटर चार्ज करू शकता. सौर ऊर्जेचा वापर केल्यास तुमचा विजेवर होणारा खर्च कमी होऊ शकतो. चला जाणून घेऊया या सोलर पावर जेनरेटरची वैशिष्ट्ये आणि किंमत.
SARRVAD Portable Solar Power Generator चे फीचर्स
या सोलर पावर पोर्टेबल जेनरेटरची क्षमता 42000mAh 155Wh इतकी आहे. पूर्णपणे चार्ज झाल्यावर हा जेनरेटर एक छोटं घर सहज प्रकाशमान करू शकतो. तुम्ही याच्या मदतीनं iPhone 8 जवळपास 8 वेळा रिचार्ज करू शकता. हा घरगुती वापरसह कॅम्प आणि मोठ्या प्रवासात इमर्जेंसी पावर बॅकअपसाठी देखील योग्य ठरू शकतो. याच्या मदतीनं फोन, टॅबलेट, लॅपटॉप, हॉलिडे लाईट, रेडियो, टीव्ही देखील वापरता येईल. या कॉम्पॅक्ट जेनरेटरचं वजन फक्त 1.89 किलोग्राम आहे. हा एका पावर अॅडॉप्टर आणि 1 कार चार्जरसह येतो जेणेकरून तुम्ही हा वॉल आउटलेट किंवा कार अॅडॉप्टरच्या मदतीनं देखील हा चार्ज करू शकाल. किंवा तुम्ही हा सोलर पॅनल (14V-22V / 3A मॅक्स) चा वापर करून सूर्य प्रकाशाच्या मदतीनं हा रिचार्ज करू शकता.
या मल्टीपर्पज पोर्टेबल सौर जेनरेटरमध्ये 2W अल्ट्रा ब्राईट एलईडी टॉर्च, ब्लिंक, एसओएस सारख्या सुविधा देखील आहेत. SARRVAD S-150 पोर्टेबल जेनरेटर तीन पद्धतीनं रिचार्ज करता येतो. हा AC 220V वॉल सॉकेटद्वारे पूर्णपणे रिचार्ज होण्यास 6-7 तासांचा कालावधी लागतो. तसेच 30W ते 50W, 14-22V / 3A सोलर पॅनलचा वापर करून सौर जेनरेटर थेट सूर्यप्रकाशानं रिचार्ज करता येईल. यातील इन-बिल्ट एमपीपीटी सौर चार्ज कंट्रोलर त्वरित आणि स्मार्ट चार्ज करण्यास सक्षम आहे. तसेच हा 12 वी/24 वी कार सिगरेट सॉकेटच्या माध्यमातून देखील रिचार्ज करता येतो.
SARRVAD Portable Solar Power Generator ची किंमत
SARRVAD पोर्टेबल सोलर पावर जेनरेटरची किंमत पाहता, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर हा 19,000 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच HSBC कॅशबॅक कार्ड, क्रेडिट कार्डवर तुम्ही 5 टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळवू शकता. जर तुम्ही EMI वर हा सोलर पावर जेनरेटर विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला प्रति माह 894 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. कंपनी या जेनरेटरवर 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.















