खिशाला परवडणाऱ्या किंमतीत 6GB रॅम असलेला Redmi चा स्वस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

Redmi 10A Sport स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. शाओमीनं या स्मार्टफोनचा अधिकृत लाँच केला नाही परंतु हा किफायतशीर हँडसेट कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. रेडमीचा हा फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Redmi 10A चा अपग्रेड व्हर्जन आहे. Redmi 10A स्मार्टफोनची स्पोर्ट एडिशनशी तुलना करायची झाल्यास कंपनीनं रॅम आणि स्टोरेज दोन्ही वाढवले आहेत. Redmi के या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा, 6GB रॅम, वॉटरड्रॉप स्टायल नॉच, मोठा डिस्प्ले आणि मीडियाटेकचा प्रोसेसर देण्यात आला आहे. पुढे आम्ही Redmi 9A Sport स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.

Redmi 10A Sport ची किंमत आणि उपलब्धता

Redmi 10A Sport स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. शाओमीचा हा फोन चारकोल ब्लॅक, स्लेट ग्रे आणि सी ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. Redmi 10A Sport भारतात 10,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. Redmi 10A Sport शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाईट आणि Amazon India वरून विकत घेता येईल. या हँडसेटची विक्री सुरु देखील झाली आहे.

Redmi 10A Sport वरील ऑफर

Xiaomi India वेबसाईटवर Redmi 10A Sport स्मार्टफोनवर लाँच ऑफर अंतर्गत 750 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅक MobiKwik वॉलेटवरून पेमेंट करताना MBK750 कुपन कोड वापरल्यावर मिळेल. तर Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डनं Redmi 10A Sport स्मार्टफोन 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI वर विकत घेता येईल. तसेच सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10 टक्के (सुमारे 750 रुपये) चा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

Redmi 10A Sport चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.53-इंच LCD HD+ डिस्प्ले
  • 13MP रियर कॅमेरा
  • 5MP फ्रंट कॅमेरा
  • MediaTek Helio G25 प्रोसेसर
  • 6GB + 128GB
  • 5,080mAh बॅटरी, 10W चार्जिंग

Redmi 10A Sport स्मार्टफोनमध्ये 6.53-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन HD+ 720 x 1,600 पिक्सल आणि 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि ब्राईटनेस 400 निट्स आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात LED फ्लॅशसह 13MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

शाओमीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन 2GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे एकूण 10GB रॅमची ताकद यात मिळू शकते. प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G25 चिपसेट मिळतो. शाओमीचा हा फोन अँड्रॉइड 11 OS आधारित MIUI 12.5 वर चालतो.

पावर बॅकअपसाठी या रेडमी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये ड्युअल सिम, 4G VoLTE, WiFi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, GPS, microUSB पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक मिळतो. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक फिचर मिळतं.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here