Amazon Prime Video वरील 10 Best Web Series! ज्या प्रत्येकाने पहिल्या पाहिजेत!

Amazon Prime Video हा असा OTT Platform आहे ज्याचे सब्सक्राइबर सर्वाधिक आहेत. रोज लाखो लोक प्राईम व्हिडीओवर आपलं आवडीचं कंटेट बघतात. या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रत्येक शैली आणि चवीच्या Web Series, Movies आणि Prime Original Shows आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये Prime Video वर काही अशा शानदार वेब सीरीज रीलिज झाल्या आहेत ज्यांनी देश-विदेशात जबरदस्त ठसा उमटवला आहे. आज आम्ही Amazon Prime वरील अशा 10 Best Web Series ची यादी घेऊन आलो आहोत ज्या भारतात खूप लोकप्रिय आहेत आणि वेब सीरिज प्रेमींनी एकदा तरी त्या पहिल्या पाहिजेत.

10 Best Web Series on Prime Video

  • The Family Man
  • Mirzapur
  • Paatal Lok
  • Panchayat
  • Inside Edge
  • Four More Shots Please
  • Breathe
  • Tandav
  • Guilty Minds
  • The Boys

The Family Man

एक एजंट देशाला शत्रूपासून वाचवण्यासाठी मोठ्या संकटांचा सामना करतो. परंतु जेव्हा त्याच्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा देशाची नोकरी आणि घराची जबाबदारी यात संतुलन साधनं किती कठीण आहे हे द फॅमिली मॅनमध्ये दाखवण्यात आलं आहे. सीरिजच्या गोष्टीत सस्पेंस आणि थ्रिलर इतका की तुम्ही तुमची नखं खाण्यास सुरुवात कराल. या सीरीजचे दोन सीजन आले आहेत जे Prime Video वर पाहता येतील. The Family Man मध्ये Manoj Bajpayee, Priyamani आणि Sharib Hashmi सोबतच Samantha Ruth Prabhu, Ashlesha Thakur आणि Shreya Dhanwanthary सारखे स्टार्स आहेत.

Mirzapur

कालीन भैयाचं संपूर्ण मिर्जापुरवर राज्य असतं ज्याच्या छत्राखाली बेकायदेशीर धंदे सुरु असतात. त्याचा उत्तराधिकारी मुन्ना भैया आहे. ज्याच्या समोर गुड्डू पंडित पहाडासारखा उभा आहे. हिंसा आणि शिव्यांचा भरमार असून देखील या वेब सीरीजला लोकांनी डोक्यावर घेतलं आहे. Mirzapur Season 2 देखील आला आहे आणि या वेब सीरीजमध्ये Pankaj Tripathi, Ali Fazal, Divyenndu आणि Rasika Dugal सारखी ओटीटीवरील मोठी नावे आहेत.

Paatal Lok

पाताल लोक एक क्राईम फिक्शन वेब सीरिज ज्यात पोलीस, पत्रकार आणि गुन्हेगार यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. समाजातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित लोकांच्या चेहऱ्याच्या मागे देखील एक मोठा गुन्हेगार असू शकतो हे पाताल लोकमध्ये बघायला मिळतं. तर दुसरीकडे एक मिडिल क्लास पोलीस ऑफिसरचं कौटुंबिक जीवन कसं कठीण असू शकतं हे देखील Paatal Lok मध्ये दाखवण्यात आलं आहे. या वेब सीरीजमध्ये Jaideep Ahlawat, Abhishek Banerjee, Neeraj Kabi आणि Swastika Mukherjee यांची जबरदस्त अ‍ॅक्टिंग आहे.

Panchayat

पंचायत वेब सीरीजमधून सिद्ध झालं आहे की OTT Platform वर ग्लॅमर, शिवीगाळ आणि हिंसा न दाखवता देखील हिट होता येतं. खूप साध्य-सरळ ग्रामीण भागातील गोष्ट दाखवणाऱ्या Panchayat चा दुसरा सीजन देखील आला आहे आणि लोकांना तो आवडला देखील आहे. फुलेरा गावाच्या या गोष्टीत सचिवजीच्या भूमिकेत Jitendra Kumar सोबत Chandan Roy, Raghubir Yadav आणि Faisal Malik यांची टोळी आहे.

Inside Edge

भारतीयांचं क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. परंतु या मनोरंजन आणि ग्लॅमरच्या खेळाच्या मागे देखील एक काळं जग आहे, त्याची गोष्ट इनसाईड एज वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. कशाप्रकारे मॅच फिक्सिंग होते, क्रिकेट मॅचमध्ये तसेच प्लेयरवर सट्टेबाजी कशी केली जाते, हे सर्व Amazon Prime वरील Inside Edge Web Series मध्ये बघायला मिळतं. तीन सीजन असलेल्या या वेब सीरीजमध्ये Richa Chadha, Sayani Gupta, Vivek Oberoi, Tanuj Virwani आणि Aamir Bashir यांनी काम केलं आहे.

Four More Shots Please

Feminism टॉपिकवर बनलेली ही वेब सीरीज चार मुलींची गोष्ट आहे. चौघीनांही आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचं आहे आणि समाजाच्या नियमांना त्या विरोध करतात. वेगळे विचार असलेल्या चारही मुलींमध्ये कोणी सिंगल मदर आहे तर कोण्ही बायसेक्सुअल आहे, कोणाला लठ्ठपणाचा त्रास आहे तर कोणी रिलेशनशिपसाठी उतावीळ आहे. लव आणि लस्टनं भरपूर असलेल्या या सीरीजचे 2 सीजन आले आहेत ज्यात Sayani Gupta, Shibani Dandekar, VJ Bani आणि Maanvi Gagroo सह Lisa Ray, Amrita Puri, Milind Soman आणि Prateik Babbar सारखे चेहरे आहेत.

Breathe

Breathe Web Series season 2 देखील रिलीज करण्यात आला आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीजनमध्ये R. Madhavan प्रमुख भूमिकेत आहे तर दुसऱ्या सीजनमध्ये Abhishek Bachchan दिसला आहे. खूपच सस्पेंससह या सीरीजमध्ये पिता-पुत्राचं नातं दाखवण्यात आलं आहे. जेव्हा आपलं मूल संकटात असतं तेव्हा त्याला वाचवण्यासाठी बाप कुठल्या थराला जाऊ शकतो हे दखवण्यात आलं आहे. एक सभ्य बाप मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी सैतान देखील बनू शकतो.

Tandav

Saif Ali Khan, Sunil Grover आणि Mohammed Zeeshan Ayyub सहित Gauahar Khan, Kritika Kamra, Sarah-Jane Dias व Shonali Nagrani स्टारर तांडव वेब सीरीज एक पॉलिटिकल ड्रामा आहे ज्यात दिल्लीची सत्ता आणि जेएनयूच्या गल्ल्या दाखवण्यात आल्या आहेत. खुर्ची मिळवण्यासाठी मुलगा आपल्या पंतप्रधान बापाची हत्या करतो. राजकारणाच्या चिखलात उतरणारा माणूस कशाप्रकारे त्यात अडकत जातो, हे Tandav Web Series मध्ये मोनोरंजक पद्धतीनं दखवण्यात आलं आहे.

Guilty Minds

Guilty Minds एक legal drama आहे जो साल 2022 मध्ये प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. या वेब सीरीजमध्ये एक लॉ फर्मची गोष्ट दाखवण्यात आली आहे जी आपल्या क्लायंट आणि केसला जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. कायदा आणि न्यायला बाजूला सारून लोकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे या वेब सीरीजमध्ये हटवण्यात आले आहेत. Guilty Minds मध्ये Varun Mitra, Shriya Pilgaonkar, Namrata Sheth, Diksha Juneja, Karishma Tanna आणि Kulbhushan Kharbanda सारखे स्टार्स आहेत.

The Boys

द बॉयज अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सुपरहिट वेब सीरीज पैकी एक आहे. ही एक अमेरिकन वेब सीरीजमध्ये आहे ज्यात म्हणायला तर सुपर हीरोज आहेत परंतु ते जगाला वाचण्यापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीची जास्त काळजी घेतात. तीन सीजन असलेली The Boys सीरिज सुपर पावर असलेल्या लोकांच्यामधील राजकारण बारकाईनं दाखवण्यात आलं आहे. वेब सीरीजमध्ये सुपरहीरो म्हणवणाऱ्या लोकांची दुसरी बाजू समोर येते जे मानवतेचे रक्षक नसून स्वार्थी आहेत. या मतलबी सुपर हिरोजच्या अन्यायाला बळी पडलेली आणि त्यांच्या विरुद्ध लढा देणारी सामान्य लोकांची टोळी म्हणजे ‘द बॉयज’!

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here