5G Service लवकरच भारतात प्रत्यक्षात येणार आहे. 5G Spectrum Auction पूर्ण झालं आहे आणि Jio, Airtel तथा Vi टेलीकॉम ऑपरेटर्सनी आपले 5जी बँड्स स्पेक्ट्रम निवडले आहेत. मोबाईल युजर्सनी 5G Smartphones विकत घेतले आहेत आणि आता फक्त 5G Network सक्रिय होण्याची प्रतीक्षा आहे. भारतात ही सेवा इतर देशांच्या तुलनेत स्वस्त असेल असं सरकारनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. परंतु स्वस्त 5जी रिचार्ज प्लॅन्सची एस्केह असलेल्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. 5जी टेलीकॉम सेवा सुरु होण्याआधी 4जीचे टॅरिफ वाढवले जाऊ शकतात आणि येत्या काही महिन्यांमध्ये 4G Recharge Plans मध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.
पुन्हा महागणार रिचार्ज प्लॅन्स
5जीची सुरुवात होण्याआधी पुन्हा एकदा 4जी रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या जाऊ शकतात. क्रिसिल रेटिंग्स, नोमुरा आणि गोल्डमॅन साक्स या रिसर्च फर्मनी यंदा म्हणजे 2022 मध्ये भारतीय दूरसंचार कंपन्या पुन्हा एकदा आपल्या Tariff Plan Prices वाढवतील तसेच यावेळी मोबाईल रिचार्ज प्लॅन्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाईल, अशी शक्यता वळवली आहे. रिलायन्स जियो, एयरटेल आणि विआय तिन्ही कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स महाग होणार आहेत. फर्मच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की 4जी टॅरिफ वाढवल्यानंतर या ऑपरेटर 5जीसाठी देखील प्रीमियम टॅरिफ वसूल करतील. हे देखील वाचा: Jio ला आस्मान दाखवण्यासाठी Airtel ची 5G Service याच महिन्यात होणार लाँच; जाणून घ्या बँड, सिम आणि प्लॅनची संपूर्ण माहिती
4जी प्लॅन्समध्ये किती होणार वाढ
रिपोर्टनुसार 4जी टॅरिफ प्लॅन्स वाढवण्यामागे एक कारण 5जी सर्व्हिसचा वापर करण्यास प्रोत्साहन देणं, हे देखील असू शकतं. CRISIL नुसार जास्तीत जास्त मोबाईल युजर 5जी सर्व्हिसकडे वळावे या उद्देशाने देखील टेलीकॉम कंपन्या 4जी प्लॅन्स महाग करू शकतात. तर Nomura Global Markets Research नुसार 1.5GB per day देणाऱ्या Mobile recharge plan वर सर्वात जास्त प्रीमियम वसूल केला जाऊ शकतो जो वर्तमान किंमतींपेक्षा 30 टक्क्यांपर्यंत जास्त असू शकतो. हे देखील वाचा: कोणती टेलीकॉम कंपनी देणार किती 5G Internet Speed? जाणून घ्या Jio, Airtel आणि Vi चा 5जी प्लॅन
Jio, Airtel आणि Vi चे 5जी प्लॅन
5जी एयरवेव्सच्या लिलावातून सरकारला 1,50,173 कोटी म्हणजे 1.5 लाख कोटी रुपयांची झाली आहे. 5जी स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी Reliance Jio नं 88,078 कोटी रुपये, Bharti Airtel नं 43,084 कोटी रुपये तर Vi नं 18,784 कोटी रुपये दिले आहेत. या कंपन्यांनी अनुक्रमे 24,740 MHz स्पेक्ट्रम, 19,867 MHz स्पेक्ट्रम आणि 2,668 MHz स्पेक्ट्रम मिळवले आहेत. आता तिन्ही कंपन्यांमध्ये सर्वप्रथम 5जी सर्व्हिस रोलआउट करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. जियो आणि एयरटेलनं याच महिन्यात 5G सेवा लाँच करण्याची तयारी दाखवली आहे तर वोडाफोन-आयडियाकडून अशी कोणतीही माहिती आली नाही.















