5G Internet वापरण्यासाठी भारतीय मोबाईल युजर्स उत्सुक आहेत. जेव्हापासून समजले आहे की 5जी इंटरनेट स्पीड सध्याच्या 4G Speed पेक्षा 10 पट जास्त असेल आणि संपूर्ण चित्रपट काही मिनिटांत डाउनलोड करता येईल, तेव्हपासूनच सुपर फास्ट 5जी इंटरनेटची मजा घेण्यासाठी लोक 5G फोन्स घेऊन तयार बसले आहेत. 5G Spectrum Auction मध्ये Jio, Airtel आणि Vi ला 5जी स्पेक्ट्रमचं वाटप करण्यात आलं आहे यात 700 MHz 5G Bands व 26GHz 5जी बँडचा देखील समावेश आहे. आता सर्वाना प्रश्न पडला आहे की रिलायन्स जियो, एयरटेल किंवा विआय पैकी कोणती कंपनी किती फास्ट 5जी इंटरनेट स्पीड देणार आहे. पुढे आम्ही याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
5G in India
Jio नं 4G च्या बाबत स्वतःला नंबर वन सिद्ध केल्यानंतर आता 5G Service मध्ये देखील आपली पावर दाखवू शकते. कंपनीचे चेयरमन Aakash Mukesh Ambani यांनी सांगितलं आहे की ते देशात सर्वप्रथम 5जी सर्व्हिस उपलब्ध करतील. 5जी रोलआउटची कोणतीही तारीख ठरली नाही परंतु 15 ऑगस्टला 5G in India संबंधित मोठी घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.
Jio 5G Plan
रिलायन्स जियोनं 5G Spectrum Auction मध्ये सर्वात जास्त 24,740 MHz स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत ज्यांची किंमत 88,078 कोटी रुपये आहे. भारतातील सर्व 22 टेलीकॉम सर्कल्ससाठी कंपनीनं 5जी स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. जियोनं सर्वात शक्तिशाली व लांबवर रेंज 700 MHz 5G Band पासून सर्वात फास्ट इंटरनेट देणाऱ्या 26 GHz High frequency band विकत घेतला आहे.
यावरून स्पष्ट झालं आहे की रिलायन्स जियो 5जी नेटवर्कचं सिग्नल व कव्हरेज मजबूत असणार नाही तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देखील सुपर फास्ट असेल. 5G ट्रायल्समध्ये देखील Jio नं 1 Gbps Speed मिळवला आहे.
Airtel 5G Plan
जियोनं देशातील सर्व 22 सर्कल्समध्ये स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत तर दुसऱ्या सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनी Airtel नं कमी लोकसंख्या असलेल्या शहर आणि लोकवस्त्यांना लक्ष्य केलं आहे. एयरटेलनेनं मिडबँड स्पेक्ट्रममध्ये जास्त रुची दाखवली आहे. या बँड्सवर 900 Mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळवता येऊ शकतो तसेच यांचा नेटवर्क कव्हरेज एरिया देखील हाय फ्रीक्वेंसी बँड्सपेक्षा जास्त आहे.
एयरटेलकडे असलेले मिड फ्रीक्वेंसी बँड्स हाय बँडच्या तुलनेत स्वस्त देखील आहेत ज्यामुळे येत्या काळात कंपनी Low Cost 5G Service तसेच स्वस्त 5G Plans चे फायदे ग्राहकांना देऊ शकते. Airtel नं Nokia सह मिळून 700MHz band वर 5G ट्रायल्स केले आहेत ज्यात दोन टेस्टिंग साईट्स दरम्यान 40 किलोमीटरचं अंतर होतं.
Vi 5G Plan
Vi नं 5जी स्पेक्ट्रम लिलावात दाखवून दिलं की कंपनीचं लक्ष्य नवीन 5जी सर्व्हिसच्या विस्तारासह वर्तमान 4जी सर्व्हिसला मजबूत करणं देखील आहे. विआयनं 18,784 कोटी रुपयांच्या 2,668 MHz स्पेक्ट्रमचं संपादन केलं आहे. कंपनीनं 17 सर्कल्समध्ये mid-band 5G spectrum (3300 MHz band) घेतले आहेत तसेच 16 सर्कल्समध्ये 26 GHz band mmWave 5G spectrum मिळवलेले आहेत.
यावरून अंदाज लावला जात आहे की कंपनी ग्रामीण भागांपेक्षा शहरांमध्ये आपल्या 5जी सर्व्हिसवर जास्त काम करेल तसेच यात दूरवरच्या कव्हरेजपेक्षा जास्त लक्ष फास्ट इंटरनेट स्पीडवर दिलं जाऊ शकतं.