480km च्या जबरदस्त रेंजसह येतेय BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV; लाँचपूर्वीच लीक झाला लुक

BYD Atto 3 Electric car Spotted Ahead Of india Launch

BYD Electric Car launch: इलेक्ट्रिक व्हेईकल्सकडे भारतीय ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. फक्त टू व्हिलर्स नव्हे तर इलेक्ट्रिक फोर व्हिलर्सची मागणी देखील वाढत आहे. अलीकडेच महिंद्रा मोटर्सनं देखील या सेगमेंटमध्ये पाहिलं पाऊल टाकलं आहे. आणि आता BYD देखील ऑक्टोबरमध्ये भारतात नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याची योजना बनवत आहे.

ही नवीन कार कंपनीची Electric Car नसेल याआधी देखील कंपनीनं देशात e6 इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. आता BYD एसयूव्ही सेग्मेंटमध्ये इलेक्ट्रिक कार सादर करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीचे आगामी वाहन Atto 3 नावानं ग्राहकांच्या भेटला येईल. परंतु अजूनतरी लाँच डेट आणि फीचर्सबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, लाँचच्या आधी या EV चे फीचर्स आणि इमेज लीक झाल्या आहेत, त्यामुळे या कारच्या लुकचा खुलासा झाला आहे.

BYD Atto 3 Electric car Spotted Ahead Of india Launch

BYD Atto 3 Electric SUV

ऑटो साइट Rushlane च्या रिपोर्टनुसार BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) च्या इमेज आणि फीचर्स समोर आले आहेत. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही चेन्नईमध्ये टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. BYD Atto 3 मध्ये अनेक मॉडर्न फीचर्स मिळतील. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल Tata Tiago EV! चालता-चालता होणार बॅटरी चार्ज

या इलेक्ट्रिक कारमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ऑटोनोमस इमरजेंसी ब्रेकिंग, लेन असिस्टंट, डिपार्चर वॉर्निंग, फ्रंट आणि रियर कॉलिजन वॉर्निंग, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि रियर क्रॉस ट्रॅफिक ब्रेकिंग देखील असेल. त्याचबरोबर कारमधील फीचर्स कंट्रोल करण्यासाठी कंपनी या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 12.8 इंचाची टचस्क्रीन देईल.

फीचर्स

BYD Atto 3 मध्ये 201bhp आणि 310Nm इलेक्ट्रिक मोटरसह 60.5kWh बॅटरी पॅकची फायरपावर देण्यात येईल. Atto 3 एकदा चार्ज केल्यावर 480km ची रेंज देईल, असा दावा करण्यात आला आहे. ही आगामी कार 6.6kW AC चार्जरच्या माध्यमातून 9.5 तासांमध्ये फुल चार्ज करता येईल, असं सांगण्यात आलं आहे. या ईव्ही एसयूव्ही मध्ये एलईडी हेडलॅम्प, 12.8 इंचाची रोटेटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पाच इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पावर्ड फ्रंट सीट, वायरलेस चार्जर, अ‍ॅम्बिएंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि सात एयरबॅग असतील.

प्राइस

BYD Atto 3 एक प्रीमियम एसयूव्ही असेल आणि हिची किंमत देखील प्रीमियम रेंजमध्ये असेल. हिची किंमत Rs 25 lakh (ex-showroom) रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते, असं देखील मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. बाजारात या कारच्या Hyundai Kona Electric आणि MG ZS EV कडून तगडे आव्हान मिळू शकते. हे देखील वाचा: Hero Electric Scooter च्या लाँचच मुहूर्त ठरला; TVS आणि Ola ला देणार टक्कर

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here