Hero Electric Scooter च्या लाँचच मुहूर्त ठरला; TVS आणि Ola ला देणार टक्कर

hero vida electric scooter launch 7th october price range image

Hero Vida Electric Scooter Launch Date: Electric Two Wheelers ची लोकप्रियता पाहून जगातील सरावात मोठी दुचाकी वाहन निर्माता कंपनी Hero Motocorp (हीरो मोटोकॉर्प) देखील या स्पर्धात उतरणार आहे. तुम्ही देखील Hero Electric Scooter ची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे की पुढील महिन्यात कंपनीची पहिली बॅटरी असलेली स्कूटी लाँच होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीनं आपल्या डीलर्स, गुंतवणूकदार आणि ग्लोबल डिस्ट्रीब्यूटरना लाँचसाठी इन्व्हिटेशन पाठवलं आहे. हा लाँच इव्हेंट राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये होणार आहे जिथे नवीन हीरो इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन Vida (वीडा) सब-ब्रँड (Hero Vida Electric Scooter) अंतगर्त सादर केली जाईल.

Hero Electric Scooter ची किंमत किती असेल?

रिपोर्ट्सनुसार Hero MotoCorp (हीरो मोटोकॉर्प) 7 ऑक्टोबर 2022 ला आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करेल, जी भारतात उदयास येत असलेल्या मोबिलिटी सॉल्यूशंससाठी बनवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटीच्या किंमत आणि संपूर्ण फीचर्सचा खुलासा लाँचच्या वेळी केला जाईल. परंतु, लीक रिपोर्ट्सनुसार या स्कूटीची किंमत जवळपास 1 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: नंबर प्लेटवरून मिळवा वाहनांची कुंडली; फक्त एका एसएमएसवर मिळेल मालकाच्या नावासह संपूर्ण माहिती

 hero vida electric scooter launch 7th october price range image

Hero Electric Scooter चा लुक व इमेज

काही महिन्यांपूर्वी जयपुरमधील Hero Motocorp च्या R&D फॅसिलिटी सेंटरच्या बाहेर हीरो इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्रोडक्शन रेडी यूनिटची झलक दिसली होती, त्यानुसार ही स्कूटर ड्युअल टोन म्हणजे ब्लॅक अँड वाइट कलर ऑप्शनमध्ये सादर केली जाईल. तसेच हीरो इलेक्ट्रिक स्कूटर साइजमध्ये देखील अन्य इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा मोठी असू शकते.

लुकच्या बाबतीत आगामी इलेक्ट्रिक स्कूटर सध्याच्या ई-स्कूटरसारखीच दिसेल. त्याचबरोबर हीरो मोटोकॉर्पच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे संभावित फीचर्स पाहता यात 10 इंचाचा रियर ब्लॅक अलॉय व्हील आणि 12 इंचाचा फ्रंट अलॉय व्हील दिला जाऊ शकतो. यात अनेक नवीन फीचर्स देखील मिळतील. हे देखील वाचा: Mahindra XUV400 EV आवडली नाही? मग या 5 Electric Cars चा विचार करता येईल, पाहा लिस्ट

 hero vida electric scooter launch 7th october price range image

बॅटरी स्वॅपिंग टक्नोलॉजीसह येईल बाजारात

Gogoro आणि हीरोच्या भागेदारीनंतर आशा आहे की दमदार बॅटरी रेंज असलेली हीरो इलेक्ट्रिक स्कूटर येत्या काळात भारतातील रस्त्यांवर धावताना दिसू शकते. आशा आहे की ई-स्कूटर अपडेटेड फीचर्ससह दमदार बॅटरी रेंज असलेले स्कूटर मार्केटमध्ये येतील. कंपनी या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीचा वापर करू शकते, त्यामुळे युजर काही सेकंदात फुल चार्ज बॅटरी स्कूटरमध्ये टाकून पुढील प्रवास सुरु करू शकेल.

 hero vida electric scooter launch 7th october price range image

या इलेक्ट्रिक स्कूटरशी होणार टक्कर

कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या माध्यमातूनच बाजारातील मोठ्या हिस्स्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे वाटत आहे की या दमदार इलेक्ट्रिक स्कूटरला भारतातील Bajaj Chetak आणि TVS iQube सह अन्य कंपन्यांच्या स्वस्त-महाग इलेक्ट्रिक स्कूटरकडून आव्हान मिळेल. आता हे आव्हान हिरो मोटोकॉर्प कसं पार करेल हे 7 ऑक्टोबरनंतरच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here