Amazon Extra Happiness Days Sale लाइव्ह झाला आहे. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजिरेटर आणि दुसऱ्या अन्य कॅटेगरीच्या प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान OnePlus, Samsung, realme, Redmi, आणि दुसऱ्या ब्रँडच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही तुमच्यासाठी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. अॅमेझॉन सेल दरम्यान बजेट आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. तसेच अॅमेझॉनच्या या सेल दरम्यान Axis, Citi आणि ICICI Bank डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. इथे आम्ही तुम्हाला Amazon Extra Happiness Days Sale दरम्यान स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.
Amazon Extra Happiness Days Sale : Best Smartphone Deals
Samsung Galaxy Z Fold3 5G
Samsung Galaxy Z Fold3 5G स्मार्टफोन बेस्ट प्रीमियम स्मार्टफोन आहे जो सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. Amazon Extra Happiness Days Sale दरम्यान सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन कुपन डिस्काउंटसह 1,09,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Galaxy Z Fold3 5G सॅमसंगचा हा पहला फोल्डेबल फोन आहे जो S Pen सपोर्टसह येतो.
प्राइस: 1,71,999 रुपये
डील प्राइस: 1,09,999 रुपये
realme narzo 50 5G
realme narzo 50 5G स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रियलमीच्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 15,999 रुपये
realme Narzo 50 Pro 5G
realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 920 प्रोसेसरसह सादर करण्यात आला गेला आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 5,000mAh ची बॅटरी, 33W डार्ट चार्ज फास्ट चार्जरसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
प्राइस: 21,999 रुपये
डील प्राइस: 17,999 रुपये
Redmi A1
बजेट स्मार्टफोन Redmi A1 Amazon Extra Happiness Days Sale दरम्यान 6,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi A1 स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन MediaTek Dimensity Helio A22 प्रोसेसर आणि 2GB रॅमला सपोर्ट करतो. रेडमीच्या या फोनमध्ये 8MP चा ड्युअल कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
प्राइस: 6,499 रुपये
डील प्राइस: 6,299 रुपये
Redmi 10A
Redmi 10A स्मार्टफोन अॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 8,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमीच्या या फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चा अडॅप्टर देण्यात आला आहे. रेडमी 10 ए स्मार्टफोनमध्ये 13MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 8,599 रुपये
Samsung Galaxy M13 5G
जर तुम्ही बजेट प्राइसमध्ये 5G स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर Samsung Galaxy M13 5G तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या फेस्टिवल सेल दरम्यान हा 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ 90Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. जोडीला 5,000mAh बॅटरी आणि 50MP ड्युअल कॅमेरा सिस्टम देखील मिळते.
प्राइस: 13,999 रुपये
डील प्राइस: 11,999 रुपये
Samsung Galaxy M33 5G
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन अॅमेझॉनवरून सध्या बँक डिस्काउंटसह 15,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीचा Exynos 1280 प्रोेसेसर मिळतो. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्ज देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 50MP क्वॉड रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 15,499 रुपये
iQOO 9 Pro 5G
iQOO 9 Pro 5G प्रीमियम स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान 57,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर सुमारे 7000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. फोनमध्ये 6.78-इंचाचा 2K E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. iQOO 9 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 50MP GN5 गिम्बल स्टॅबिलायजेशन कॅमेरा देण्यात आला आहे. जोडीला 4700mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज आणि 50W वायरलेस चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.
प्राइस: 64,990 रुपये
डील प्राइस: 57,990 रुपये
OnePlus 10 Pro 5G
OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोन देखील अॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान स्वस्तात विकत विकला जात आहे. वनप्लसचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन बँक डिस्काउंटसह सध्या 61,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 48MP Sony IMX789 (OIS) प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 8MP टेलीफोटो कॅमेरा मिळतो.
प्राइस: 66,999 रुपये
डील प्राइस: 61,999 रुपये
Samsung Galaxy S22 5G
Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन बँक डिस्काउंटसह 62,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy S22 5G मध्ये 6.1-इंचाचा FHD+ (120Hz) डायनमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 50MP नाइट फोटोग्राफी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 3,700mAh ची बॅटरी 25W सुपर फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
प्राइस: 72,999 रुपये
डील प्राइस: 62,999 रुपये
Samsung Galaxy S22 Ultra 5G
सॅमसंगचा प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S22 Ultra 5G अॅमेझॉन सेल दरम्यान 99,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 40MP सेल्फी कॅमेरा आणि 108MP Pro-ग्रेड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. सॅमसंगच्या S22 Ultra स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.
प्राइस: 109,999 रुपये
डील प्राइस: 99,999 रुपये














