Vivo V27 सह V27 Pro देखील येऊ शकतो बाजारात; लाँच डेट झाली लीक

Highlights

  • Vivo V27 आणि Vivo V27 Pro मार्चमध्ये भारतात लाँच होऊ शकतात.
  • या स्मार्टफोन सीरीजची किंमत 35,000 ते 40,000 दरम्यान असू शकते.
  • विवो वी17 MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरसह लॉच होऊ शकतो.

अलीकडेच बातमी आली होती की vivo लवकरच भारतीय बाजारात आपली V27 सीरीज सादर करू शकते. आता 91मोबाइल्सला मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये Vivo V27 सह Vivo V27 Pro मॉडेल देखील सादर करू शकते. याआधी माहिती आली होती की प्रो मॉडेल मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. आम्हाला बातमी मिळाली आहे की वॅनिला मॉडेल म्हणजे Vivo V27 कंपनी MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरसह सादर करू शकते. हा भारतातील पहिला फोन असेल ज्यात तुम्हाला डायमेन्सिटी 7200 प्रोसेसर मिळू शकतो.

Vivo V27 सीरिजची लीक लाँच डेट

91मोबाइल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार विवो वी27 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतीय बाजारात येऊ शकते. कंपनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा टीज करण्यास सुरु करू शकते. लाँच डेटची ठोस माहिती आली नाही परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही विवो वी27 सीरीज भारतात लाँच केली जाऊ शकते. हे देखील वाचा: India vs Australia: भारत की ऑस्ट्रेलिया कोण मारणार बाजी? अशाप्रकारे फोनवर बघा सर्व सामने लाइव्ह

वी27 सीरीजमध्ये येऊ शकतात 2 फोन

Vivo V27 series मध्ये कंपनी दोन स्मार्टफोन्सचा समावेश करू शकते. एकाचे नाव Vivo V27 असेल तर दुसरा मोबाइल फोन Vivo V27 Pro नावानं बाजारात येऊ शकतो. नावावरून समजलं असेल की प्रो मॉडेलची ताकद सीरीजच्या वॅनिला मॉडेलच्या तुलनेत जास्त असू शकते. दोन्ही डिवाइसमध्ये तुम्हाला कलर चेंजिंग बॅक पॅनलसह मिळू शकतात.

Vivo V27 आणि V27 Pro ची लीक किंमत

विवो वी27 आणि वी27 प्रो दोन्ही स्मार्टफोन हायएन्ड डिवायस असतील. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Vivo V27 ची किंमत 35,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तर Vivo V27 Pro स्मार्टफोन देखील 40,000 रुपयांच्या रेंजमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Vivo V27 चे लीक स्पेसिफिकेशन्स

विवो वी27 स्मार्टफोन भारतात लाँच होणारा पहिला असा स्मार्टफोन असू शकतो जो मीडियाटेक डिमेनसिटी 7200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. याआधी कोणताही मोबाइल फोन आतापर्यंत या प्रोसेसरसह भारतात आला नाही.

Vivo V27 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

विवो वी27 प्रो देखील मीडियाटेेक चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले दिली जाऊ शकतो तसेच यात Sony IMX कॅमेरा सेन्सर मिळू शकतात. सीरीजचा वॅनिला मॉडेल देखील अशाच स्क्रीन आणि कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. हे देखील वाचा: एक नव्हे OnePlus चे दोन फोल्डेबल येणार बाजारात; खुद्द कंपनीनं दिली माहिती

Vivo V27 आणि V27 Pro संभाव्य मेमरी व्हेरिएंट्स

मिळालेल्या माहितीनुसार विवो वी27 आणि विवो वी27 प्रो दोन्ही स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर केले जाऊ शकतात. यांच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हे विवो फोन black सह color changing blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here