OnePlus नं टीज केला फोल्डेबल फोन; ट्रेडमार्कची माहिती लीक

Highlights

  • OnePlus नं अधिकृतपणे आपले आगामी फोल्डेबल स्मार्टफोन्स टीज केले आहेत.
  • याआधी कंपनीनं OnePlus V Flip आणि V Fold ही नावे ट्रेडमार्क करून ठेवली होती.
  • हे फोन्स 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात.

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की वनप्लसनं आपल्या OnePlus Foldable आणि Flip स्मार्टफोन्ससाठी ट्रेडमार्क रजिस्टर केले आहेत. या फोन्सची इंटरनल टेस्टिंग अनेक भागात सुरु असल्याची माहिती देखील आली होती. कंपनीनं OnePlus 11 सीरिजसह अनेक प्रोडक्ट जगभरात लाँच केले आहेत. या चिनी कंपनीनं आपले आगामी फोल्ड आणि फ्लिप फोन या इव्हेंटमधून टीज केले आहेत. वनप्लसच्या सीईओनी ऑगस्ट 2022 मध्ये ट्विट केल्यानंतर कंपनीनं प्रथमच हे फोन्स अधिकृतपणे टीज केले आहेत. टीजरमधून आगामी वनप्लस व्ही फोल्ड आणि वनप्लस व्ही फ्लिप स्मार्टफोनची लाँच डेट समजली आहे.

OnePlus टीज केले फोल्डेबल स्मार्टफोन

वर सांगितल्याप्रमाणे, वनप्लसनं आपल्या आगामी फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोन्सचे फोटोज टीज केले आहेत. टीजरनुसार हे स्मार्टफोन 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सादर केले जाऊ शकतात. यंदा कंपनीनं आपल्या वनप्लस 11 सीरिजमध्ये प्रो मॉडेल सादर केला नाही. कंपनी आपल्या रिसोर्सेसचा वापर फोल्ड आणि फ्लिप लवकरात लवकर सादर कारण्यासाठी करत असल्याचं चित्र आहे.हे देखील वाचा: 16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; अ‍ॅप्पल-सॅमसंगला टाकणार का मागे?

OnePlus Flip

वनप्लसनं आगामी फोल्डेबल आणि फ्लिप स्मार्टफोन्ससाठी ट्रेडमार्क फाइल केलं आहे, ही एवढीच माहिती या स्मार्टफोन्सविषयी सध्या उपलब्ध आहे. याआधी कंपनीनं वनप्लस व्ही फोल्ड आणि व्ही फ्लिप ही नावे ट्रेडमार्क केली आहेत. हे ट्रेडमार्क चायना नॅशनल इंटेलेक्च्युल प्रॉपर्टी अ‍ॅडमिन्सट्रेशन (CNIPA) फाइल करण्यात आले आहेत.

एका टिपस्टरनं या ट्रेडमार्क फायलिंगची माहिती दिली आणि सांगितलं की हे स्मार्टफोन सध्या विविध ठिकाणी टेस्ट केले जात आहेत, ज्यात युरोपचा देखील समावेश आहे. या दोन स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कंपनीनं सॅमसंगच्या Galaxy Z Fold आणि Z Flip ला टक्कर देण्याची योजना बनवत असल्याचं समजतं. काही रिपोर्ट्सनुसार वनप्लसचे आगामी फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find N2 आणि Find N2 Flip वर आधारित असू शकतात. जे काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये सादर करण्यात आले होते. हे देखील वाचा: एक महिना टिकणार का वनप्लसच्या टॅबलेटची बॅटरी? असे आहेत OnePlus Pad चे शानदार फीचर्स

OnePlus 11 सोबत लाँच झालेले प्रोडक्ट

वनप्लसनं भारतासह जगभरात काल अनेक प्रोडक्ट सादर केले आहेत. कंपनीनं OnePlus 11 5G स्मार्टफोनसह OnePlus 11R 5G, OnePlus Pad, OnePlus Buds Pro 2, OnePlus TV 65 Q2 Pro आणि OnePlus Keyboard देखील बाजारात आणला आहे. या प्रोडक्टसमध्ये फक्त फोल्डेबल स्मार्टफोन गैरहजर वाटत होते, जे वर सांगितल्या प्रमाणे यंदा जुलै ते सप्टेंबर दरम्यान सादर केले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here