
Airtel नं आपल्या ग्राहकांना मोठी भेट देते एक नवीन प्री-पेड प्लॅन सादर केला आहे. हा रिचार्ज खूप वेगळा आहे कारण ह्यात 35 दिवसांची वैधता दिली जात आहे. इतकी वैधता असलेला प्लॅन रिलायन्स जियो आणि वोडाफोन आयडियाकडे देखील नाही. प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स पाहता ह्यात फ्री कॉलिंग, डेटा व SMS मिळत आहेत. चला एक नजर टाकूया ह्या नव्या प्लॅनवर…
Airtel Rs 289 प्लॅनची संपूर्ण माहिती
- भारती एयरटेलचा 289 रुपयांचा प्लॅन एक नवीन प्रीपेड प्लॅन आहे जो 35 दिवसांच्या वैधतेसह येतो.
- प्लॅनमध्ये युजर्सना 4GB डेटा, 300 एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते.
- एयरटेल थँक्ससह अतिरिक्त लाभचा देखील समावेश करण्यात आला आहे – अपोलो 24|7 सर्कल, मोफत हेलोट्यून्स, आणि विंक म्यूजिक इत्यादी.
नोट : ह्या रिचार्ज प्लॅनची खासियत म्हणजे ह्याची वैधता. कारण इतर कोणतीही टेलीकॉम कंपनी अशाप्रकारच्या वैधतेसह कोणताही प्रीपेड प्लॅन सादर करत नाही. हा प्लॅन वापरल्यावर ग्राहकांना रोज 8.25 रुपयांचा खर्च येईल.
जर तुम्ही 30 दिवसांची वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर कंपनीकडे 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. हा 289 रुपयांचा प्लॅन प्रमाणे एयरटेल थँक्स बेनिफिट देतो आणि 3GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतात. तसे पाहता 199 रुपयांचा प्लॅन 289 रुपयांचा प्लॅन जास्त किफायशीर वाटतो.
Airtel Xstream अॅपचं नाव बदललं
अलीकडेच Airtel सेल्युलर ग्राहकांना स्ट्रीमिंग कंटेंट प्रोवाइड करणाऱ्या Airtel Xstream अॅपचं नाव बदलून Airtel Xstream Play करण्यात आलं होतं. तसेच कंपनीनं नावासह ह्या अॅपच्या युआय मध्ये देखील मोठा बदल केला आहे. प्लॅटफॉर्मवर ग्राहकांसाठी एक डझन नवीन आणि दर्जेदार ओटीटी प्लॅटफॉर्म जोडण्यात आले आहेत.














