मोबाईल फोन निर्माता कंपनी शाओमी ने आज मी8 सीरीज मध्ये एक नवीन फोन लॉन्च केला आहे. आधी बातमी अशी आली होती की हा शाओमी मी8 यूथ नावाने लॉन्च केला जाईल पण कंपनी ने याला मी8 लाइट चे नाव दिले आहे. या फोनचे काही फोटोग्राफ कंपनी ने आधीच शेयर केले होते आणि आज नवीन कलर वेरियंट सह फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. शाओमी मी8 लाइट चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
फोन चे स्पेसिफिकेशन पाहता शाओमी मी8 लाइट कपंनी ने ग्लास बॉडी डिजाइन सह सादर केला आहे जो ग्रेडियन कलर मध्ये उपलब्ध आहे. खास बाब म्हणजे हा फोन नवीन नॉच ट्रेंड सह सादर करण्यात आला आहे. नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा, सेंसर्स आणि ईयरपीस आहे. कंपनी ने हा 6.26-इंचाच्या मोठया स्क्रीन सह सादर केला आहे आणि याचे स्क्रीन रेजल्यूशन 1080 x 2280 पिक्सल आहे. फोन मध्ये 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या 2.5डी कर्व्ड ग्लासचा वापर करण्यात आला आहे.
शाओमी मी8 लाइट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2.0गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन तीन मेमरी वेरियंट मध्ये उपलब्ध होईल. 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी, 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी. सर्व वेरियंट सोबत मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
फोटोग्राफी बद्दल सांगायचे झाले तर हा फोन खुप चांगला आहे. कंपनी ने हा डुअल रियर कॅमेरा सह सादर केला आहे. फोन मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा सेंसर 5-मेगापिक्सलचा. सेल्फी साठी कंपनी ने यात 24.8-मेगापिक्सल चा कमेरा दिला आहे.
हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे आणि फोन मध्ये तुम्हाला मीयूआई ची लेयर मिळेल. शाओमी मी8 लाइट मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि दोन्ही स्लॉट मध्ये तुम्ही 4जी वापरू शकता. वोएलटीई, वाईफाई, ब्लूटूथ, यूएसबी टाइप—सी, जीपीएस आणि ग्लोनॅस सारखे आॅप्शन पण आहेत. सिक्योरिटी साठी कंपनी ने यात फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे जो बॅक पॅनल वर आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,350 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
चीन मध्ये शाओमी मी8 लाइट ची बेसिक किंमत 1,399 युआन आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 14,800 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू—वॉयलेट ग्रेडियनट आणि पर्पल—गोल्ड ग्रेडियंट सह तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.














