Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

5G Services भारतात सुरु झाली आहे. Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सेवा सादर केली आहे आणि देशातील अनेक शहरांमध्ये 5G Network सुरु झालं आहे. आजपासून एयरटेल व जियो युजर हायस्पीड 5G Internet वापरू शकतात. 5जी नेटवर्क रोलआउट झाल्यानंतर आता 5G Plan Price in India बद्दल मुकेश अंबानींच्या रिलायन्स जियो बाबत मोठी माहिती समोर आली आहे. Jio True 5G बद्दल कंपनीनं घोषणा केली आहे की Jio Welcome Offer अंतगर्त जियो कस्टमर्सना 5जी सर्व्हिससाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार नाहीत तसेच Jio 4G Tariff Price वरच Jio 5G Service मिळेल.

Jio 5G Details

  • जियो 5जी प्लॅन्समध्ये किती 5जी डेटा मिळेल?
  • जियो 5जी इंटरनेटचा स्पीड किती असेल?
  • जियो 5जी प्लॅन्सची प्राइस किती असेल?
  • कोणत्या मोबाइल फोनमध्ये चालेल जियो 5जी?

Jio 5G Plan

रिलायन्स जियोनं स्पष्ट केलं आहे की कंपनीचे सर्व ग्राहक कोणतंही अतिरिक्त शुल्क न देता Jio 5G Network चा आनंद घेऊ शकतात तसेच सुपरफास्ट 5जी इंटरनेट वापरू शकतात. Jio Welcome Offer अंतगर्त जियो ग्राहकांना Jio True 5G customer बनवण्यासाठी इन्व्हाईट पाठवलं जात आहे आणि ज्या ग्राहकांना हे इन्व्हाईट मिळेल ते जियो नेटवर्क वर Unlimited 5G Data वापरू शकतात. हे देखील वाचा: असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

Jio 5G Internet speed

रिलायन्स जियो आपल्या ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता Unlimited 5G Data देत आहे. 5जी इंटरनेट डेटा अनलिमिटेड मिळेल तसेच जियो 5जी इंटरनेट डेटा स्पीड 1Gbps पर्यंतचा असेल, ही महत्वाची बाब आहे. म्हणजे रिलायन्स जियो ग्राहक आपल्या 5G smartphone मध्ये 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडवर जियो 5जी इंटरनेट वापरू शकतील.

Jio 5g Plan Price In India

Jio 5G Plan Price

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रिलायन्स जियो 5जी प्लॅन्सची किंमत किती असेल. तुम्हाला सांगू इच्छितो की ते युजर Jio True 5G वापरू शकतील ज्यांनी आपल्या जियो नंबरवर 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा रिचार्ज केला असेल. म्हणजे जियो नंबरवर कमीत कमी 239 रुपयांचा बेस प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जियो युजर Free 5G Internet मिळवू शकेल ज्याच्याकडे 239 किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेला पोस्टपेड किंवा प्रीपेड प्लॅन असेल.

Jio 5g Plan Price In India

Jio 5G कसं वापरायचं?

रिलायन्स जियो 5जी नेटवर्क मिळवण्यासाठी आणि जियो 5जी इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्याकडे 5जी स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की सध्या जियो 5जी सर्व्हिस त्याचा 5जी फोन्समध्ये मिळेल ज्यात n28, n78 आणि n258 bands support असेल. म्हणजे जर तुम्ही जियो 5जी वापरण्यासाठी एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे 5जी बॅड्स असलेला मोबाइल फोनच खरेदी करा. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

Jio 5g Plan Price In India

तुमच्या 5जी स्मार्टफोनमध्ये जियो सिमवर 5जी नेटवर्क कसं अ‍ॅक्टिव्ह करायचं? जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here