
वोडाफोन आयडिया कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. 5जी लाँच करण्यात अपयशी ठरलेल्या Vi नं आपल्या दोन प्लॅनचे बेनिफिट्स बदललले आहेत. कंपनीनं ह्या दोन्ही प्लॅनची वैधता कमी केली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया की ह्या दोन्ही प्लॅनची किंमत किती आहे आणि कोणते बदल करण्यात आले आहेत.
प्लॅन्सची वैधता झाली कम
वोडाफोन-आयडियानं 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारी वैधता कमी केली आहे. वैधतेव्यतिरिक्त कंपनीनं प्लॅनमध्ये आणि कोणतेही बदल केले नाहीत.
99 रुपयांचा प्लॅन : ह्यात 28 दिवसांची वैधता मिळत होती जी कमी करून 15 दिवस करण्यात आली आहे. परंतु ह्या प्लॅनमध्ये युजर्सना 200MB डेटा आणि 99 रुपयांचा टॉकटाइम पूर्वीप्रमाणेच मिळत राहील. परंतु ह्या प्लॅनमध्ये SMS ची सुविधा देण्यात आलेली नाही.
128 रुपयांचा प्लॅन : वोडाफोन-आयडियाच्या 128 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जात होती, ती आता 18 दिवस करण्यात आली आहे. तसेच ह्यात पूर्वीप्रमाणे 99 रुपयांचा टाकटाइम आणि 200MB डेटा दिला जाईल. तसेच 10 लोकल ऑन-नेट नाइट मिनट दिले जातील. त्याचबरोबर कॉलिंगसाठी युजर्सना 2.5 पैसे प्रति सेकंदच्या हिशोबाने शुल्क द्यावे लागेल.
Vi 5G च्या प्रतीक्षेत ग्राहक
काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, त्यानुसार दूरसंचार विभाग (DoT) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की Vi ला जून 2023 मध्ये फंडिंग मिळण्याची शक्यता आहे आणि तेव्हा कंपनी आपली 5G सर्व्हिस देखील लाँच करेल. अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की फंडिंग मिळवण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि जी जून 2023 मध्ये पूर्ण होऊ शकते. परंतु अद्याप कंपनीनं 5G लाइव्ह बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.














