लेनोवोचा फोल्डेबल फोन आला समोर, स्क्रीन वाकवून हातावर बांधता येतो हा फोन

काही वर्षांपूर्वी लेनोवो ने आपला प्रोटो टाइप फोल्डेबल दाखवला होता. हा एक असा फोन होता जो तुम्ही तुमच्या मनगटावर बांधू शकत होता. फोनच्या प्रदर्शनाच्या वेळी कंपनीने सांगितले होते की हा फोन अधिकृतपणे उपलब्ध होण्यासाठी दोन तीन वर्ष लागतील. पण त्यानंतर कधीच या फोनचा उल्लेख करण्यात आला नव्हता. पण आता पुन्हा हा फोन चर्चेत आला आहे आणि बोलले जात आहे की लवकरच कंपनी लेनोवोचा हा फोल्डेबल फोन लॉन्च करणार आहे.

आज ट्विटर वर एक यूजरने लेनोवो च्या या फोल्डेबल फोनचा वीडियो पोस्ट केला आहे ज्यात तुम्ही हा फोन बघू शकता. वीडियो मध्ये तुम्ही बघू शकता की फोन योग्यरीत्या चालत आहे आणि यात अॅप्स सह अनेक गोष्टी पण इंस्टॉल करण्यात आल्या आहेत. पण हा फोन थोडा मोठा आणि जाडा वाटत आहे आणि हा मधून फोल्ड होतो. आशा प्रकारचा फोल्ड आपण माइक्रोसॉफ्ट सर्फेस बुक 2 मध्ये बघितला होता.

फोनच्या स्क्रीन वर तुम्हाला एक ब्लॅक स्पॉट साइड मध्ये दिसेल ही बीजगार आहे ज्याने हा फोन ​वाकतो. हा फोन जवळपास पूर्णपणे वाकतो आणि हा तुम्ही सहज मनगटाला बांधू शकता. पण फोन बघितल्यावर तुम्हाला समजेल की हा प्रोटोटाइप आहे आणि फाइनल प्रोडक्ट मध्ये काही गोष्टी बदलतील. पण हा वीडियो बघून तुम्हाला अंदाज येईल की कंपनी तयारी करत आहे आणि हा कधीही अधिकृतपणे लॉन्च केला जाऊ शकतो.

कंपनी ने जेव्हा सुरवातीला आपल्या या बेंड फोनचे प्रदर्शन केले होते तेव्हा माहिती देण्यात आली होती की फोन मध्ये 4.35 इंचाची एमोलेड स्क्रीन आहे याच्या मागच्या पॅनल वर लेदरचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर असे पण सांगण्यात आले आहे की हा फोन लेनोवो ऐवजी मोटो ब्रँड मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि हा मोटो रेजर सेग्मेंट मध्ये येऊ शकतो. याचबरोबर कंपनी फ्लेक्सिबल लॅपटॉप वर पण काम करत आहे.

इतर कंपन्या बद्दल बोलायचे तर सॅमसंगच्या फोल्डेबल फोनची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी हुआवई ने पण आपला फोल्डेबल टॅबलेट समोर आणला आहे. असे पण बोललेले जात आहे की एलजी पण आपला फोल्डेबल फोन घेऊन येऊ शकते कंपनी ने यासाठी पेटेंट फाइल केले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here