असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत

जर तुम्ही इंटरनेट वापरणारे असाल तर तुमचे फेसबुक अकाउंट पण असेलच. रोज तुम्ही इतरांच्या पोस्ट बघता आणि त्यावर तुमच्या रिएक्शन देता. एवढंच नव्हे तर जेव्हा तुम्ही तुमच्या टाईम लाईन वर पोस्ट करता तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंट्सची अपेक्षा करता. आधी लोक काहीपण आपल्या फेसबुक वर काहीपण टाकत होते पण आता जास्त क्रिएटिव झाले आहेत. हीच क्रिएटिविटी पाहून फेसबुक ने 3डी फोटोचा पर्याय सादर केला आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचा फोटो 3डी इफेक्ट सह पोस्ट करू शकता आणि हा पर्याय लोकांना खूप प्रभावित पण करत आहे. जर तुम्ही पण तुमच्या फेसबुक वर 3डी पोस्ट करू इच्छित असाल तर त्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.

कसा करावा 3डी फोटो अपलोड
सर्वात आधी हे लक्षात घ्या कि सध्या 3डी फोटो आॅप्शन फक्त मोबाईल ऍप मध्येच उपलब्द आहे. जर तुम्ही डेस्कटॉप वरून याचा वापर केला तर हा मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या फोन वरून फेसबुक वर 3डी फोटो शेयर करण्यासाठी सर्वात आधी
1. तुम्हाला तुमच्या फोन मध्ये फेसबुक ऍप ओपेन करून फेसबुक 360 पेजला लाइक करावे लागेल. ऍप मध्ये वर दिलेल्या सर्च बार मध्ये फेसबुक 360 लिहून सर्च करा मग हे पेज येईल. त्याला लाइक करा आणि ऍप बंद करा. आता तुमच्या फोन मध्ये फेसबुक 3डी आॅप्शन येईल.

Facebook 3D

2. आता तुमच्या मोबाईल कॅमेऱ्या मधून एक फोटो काढा. ध्यानात ठेवा हा फोटो पोट्रेट मोड मध्ये असावा. अर्थात बोके इफेक्ट ज्याला तुम्ही ब्लर बॅकग्राउंड पण म्हणता.

3. त्यानंतर फेसबुक ऍप मध्ये जाऊन न्यू पोस्ट करा.

4. खाली जिथे फोटो, वीडियो, टॅग, जिफ इत्यादी आॅप्शन येतात त्याच लाइन मध्ये 3डी फोटोचा पर्याय मिळेल.
5. तुम्हाला त्यावर क्लिक करावी लागेल आणि तो पोट्रेट मोड वाला फोटो इंसर्ट करावा लागेल आणि मग फोटो शेयर करा. अशा प्रकारे तुमचा 3डी फोटो पोस्ट होईल. जो नेहमीच्या पोस्ट पेक्षा कितीतरी चांगला दिसतो.

तुमचा हा 3डी फोटो लगेचच स्मार्टफोन, डेस्कटॉप आणि आॅक्यूलस वीआर इत्यादी वरून दिसेल. फोन थोडा हलवताच तो 3डी फोटो पण हलेल. 3डी फोटो फेसबुकच्या 360 पेक्षा खूप वेगळा आहे. 360 मध्ये कॅमेरा उजवीकडे-डावीकडे आणि वर-खाली करून संपूर्ण पॅनारॉम शूट करतात. तर यात एकाच फोटो मध्ये 3डी इफेक्ट दिला जातो.

फेसबुकचा फीचर एंडरॉयड स्मार्टफोन आणि ऍपल आईओएस दोन्हींसाठी आहे. परंतु भारतात अजूनतरी आम्ही आईओएस डिवाइस मध्ये हा बघितला आहे. एंडरॉयड फोन मध्ये हा काही दिवसांनी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here