Redmi Note 13 Pro+ 5G भारतातील लाँच कंफर्म, 200MP Camera असलेला हा फोन ​कधी येईल जाणून घ्या

Redmi 13C 4G आणि Redmi 13C 5G फोन आज भारतात लाँच झाले आहेत. रेडमी 13सी सीरीज भारतीय बाजारात येण्यासोबतच कंपनीने आपल्या ताकदवान स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ 5G च्या भारतातील लाँचची घोषणा पण केली आहे. हा मोबाइल फोन पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये भारतात लाँच होईल ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 13 Pro+ 5G भारतातील लाँच डिटेल

Redmi Note 13 Pro+ 5G जानेवारी 2024 मध्ये भारतात लाँच होईल. कंपनीने Redmi 13C series च्या लाँच दरम्यान याबाबतची घोषणा केली आहे. जाणून घेऊया की 13सी सीरीजचा लाँच व्हिडिओ कंपनीने रेडमी नोट 13 प्रो प्लस 5 जी फोनने रेकॉर्ड केला होता. ब्रँडकडून लाँचबाबत अजून कोणतेही अपडेट मिळाले नाहीत, परतुं कंफर्म केले आहे की Note 13 Pro+ 5G पुढील महिन्यात भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे.

Redmi Note 13 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : Redmi Note 13 Pro+ मध्ये 6.67-इंच की फुलएचडी+ स्क्रिन देण्यात आली आहे. हा अ‍ॅमोलेड पॅनलवर बनी 1.5के डिस्प्ले आहे ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स पीक ब्राइटनेस मिळते. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचे प्रोटेक्शन आहे.
  • प्रोसेसिंग : चायना मार्केटमध्ये हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर सादर झाला आहे जो मीयुआय 14 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • स्टोरेज : Redmi Note 13 Pro+ मध्ये 16 जीबी पर्यंतची रॅम देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन 512जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. अपेक्षा आहे की फोन या मेमरी व्हेरिएंट सह भारतात लाँच होईल.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता स्मार्टफोनमध्ये OIS सह 200MP सॅमसंग ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आले आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या मोठ्या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी यात 120 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
  • आणखी : हा फोन 3.5 मिमी हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर, ड्युअल सिम 5जी, वायफाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसीसह आहे. त्याचबरोबर पाणी आणि धुळीपासून वाचविण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here