जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच

Vivo X90 5G सीरीज कालच चीनमध्ये लाँच झाली आहे, ही कंपनीची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज आहे. या सीरीजमध्ये Vivo X90 5G, Vivo X90 Pro 5G आणि Vivo X90 Pro+ 5G असे तीन हँडसेट लाँच झाला आहेत. यातील एक्स90 आणि प्रो मॉडेल MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहेत. प्रो प्लस मॉडेलची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Vivo X90 Specifications

विवो एक्स90 स्मार्टफोनमध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2800 x 1260 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo X90 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX866 चा सेन्सर आहे जो OIS ला सपोर्ट करतो. सोबत 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी 4,810mAh ची बॅटरी मिळते जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo X90 Pro 5G Specifications

Vivo X90 Pro 5G मध्ये पंच होल असलेला 6.78 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimesnity 9200 प्रोसेसर आणि इमोर्टलिस-जी715 जीपीयूसह बाजारात आला आहे. विवो एक्स90 प्रो स्मार्टफोन Android 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Zeiss T ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX866 सेन्सर आहे. सोबत 50MP Sony IMX663 चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. फोनमधील 4,870mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Vivo X90 5G and Vivo X90 Pro 5G Price

Vivo X90 5G फोन चीनमध्ये 4 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटयामध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत RMB 3,699 (जवळपास 42,320 रुपये) आहे. 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 3,999 (जवळपास 45,759 रुपये) आहे, 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RMB 4,499 (जवळपास 51,462 रुपये) आहे. ते 12GB रॅम + 512GB स्टोरेज असेलल्या टॉप मॉडेलची किंमत RMB 4,999 (जवळपास 57,182 रुपये) आहे.

Vivo X90 Pro 5G फोन 3 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 4999 (जवळपास 57,200 रुपये) आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत RMB 5499 (जवळपास 63,000 रुपये) आहे, तर 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंट RMB 5999 (जवळपास 68,600 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here