Breaking: 19,999 रुपयांमध्ये लाँच होईल vivo Y200e 5G, लाँचच्या आधी किंमत आणि माहिती लीक

काही दिवसांपूर्वी 91मोबाइल्सने बातमी दिली होती की 22 फेब्रुवारीला vivo Y200e 5G ला भारतात लाँच केले जाईल. तसेच आज या फोनच्या किंमतीबाबत एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. भारतीय बाजारात हा फोन 19,999 रुपयाच्या सुरुवाती किंमतीसह उपलब्ध होईल. आम्हाला ही माहिती ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे.

vivo Y200e 5G ची किंमत आणि माहिती

vivo Y200e 5G सा भारतीय बाजारात 6 जीबी रॅममध्ये 128 जीबीच्या स्टोरेजसह सादर करण्यात आले आहे आणि या मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तसेच दुसरे मॉडेल 8 जीबी रॅमसह 128 जीबीच्या स्टोरेजमध्ये आहे आणि यासाठी तुम्हाला 20,999 रुपये भरावे लागतील.

vivo Y200e 5G चे स्पेसिफिकेशन आणि माहिती

  • डिस्प्ले : विवो वाय200 ई 5 जी ला कंपनीने 6.67 इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह सादर केले आहे. फोनमध्ये तुम्हाला AMOLED पॅनल मिळेल आणि हा 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात पंच होल कट आउट आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटवर पावर्ड आहे आणि यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे ज्याला अधिकतम क्लॉक स्पीड 2.2 GHz मिळते. प्रोसेसर क्वॉलकॉमच्या क्रयो आर्किटेक्चरवर आधारित आहे.
  • कॅमेरा: कंपनीने याला ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह सादर केले आहे, मेन कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तिसरा सेन्सर फ्लिकर लेन्स आहे. पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा 44 वॉट फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येतो.

भारतीय बाजारात हा फोन सॅफरॉन म्हणजे की केशरी आणि काळ्या रंगात उपलब्ध होईल. तसेच काळ्या रंगाच्या मॉडेलचे वजन 185.5 ग्रॅम आहे आणि याची जाडी 7.79 एमएम आहे. तसेच केशरी रंग असलेला फोन 191 ग्रॅम आहे आणि हा 7.99 एमएम मोठा आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here