स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन

Highlights

  • Lava Blaze 2 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल.
  • फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम असेल.
  • स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज एचडी+ पंच होल डिस्प्ले असेल.

Lava आपला नवीन फोन भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. स्वदेशी कंपनीचा नवीन फोन Lava Blaze 2 नावानं सादर केला जाईल. याची पुष्टी ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरील लिस्टिंगच्या माध्यमातून झाली आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर फोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, जिथून डिवाइसच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. परंतु अजूनही या फोनच्या अधिकृत लाँच डेटची माहिती मिळाली नाही.

लावा ब्लेज 2 ची डिजाइन

या आगामी डिवाइसची डिजाइन पाहता यात फ्लॅट-एज डिजाइन दिली जाईल. तसेच फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल दिला जाईल, ज्यात फ्रंट कॅमेरा असेल. तसेच, मागे दोन मोठे कॅमेरा रिंग असतील ज्यात दोन सेन्सर असतील. तुम्हाला माहित असेल की लावा ब्लेज 2 पूर्वी कंपनीनं Blaze सीरीजमध्ये Lava Blaze NXT, Lava Blaze Pro आणि Lava Blaze 5G स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन

लावा ब्लेज 2 ची किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी

Lava चा दावा आहे की AnTuTu स्कोरच्या आधारावर Lava Blaze 2 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात फास्ट स्मार्टफोन असेल. त्यामुळे या फोनची किंमत 10 हजार रुपयांच्या आत असेल, असा अंदाज लावला जात आहे. कंपनीनं हे देखील सांगितलं आहे की डिवाइस 6GB रॅमसह बाजारात येईल. तसेच हा व्हर्च्युअल रॅम फीचरला देखील सपोर्ट करेल आणि युजर्स कडे 5GB व्हर्च्युअल रॅम मिळवण्याचा ऑप्शन असेल.

लावा ब्लेज 2 चे स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉन लिस्टिंगनुसार, फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला HD+ 6.5-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, जोडीला 128GB UFS मेमरी दिली जाईल. इतकेच नव्हे तर यात 12nm प्रोसेस वर बनेलला प्रोसेसर देण्यात येईल, ज्याला Antutu बेंचमार्किंगवर 250K+ स्कोर मिळाला आहे. कंपनीनं याला अल्ट्रा फास्ट प्रोसेसर म्हटलं असलं तरी नावाचा खुलासा अद्याप केला नाही. त्याचबरोबर फोन 18W फास्ट चार्जर टाइप-सी यूएसबी केबलसह येईल. हे देखील वाचा: फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन

लावा ब्लेज 2 अलीकडेच गीकबेंच बेंचमार्क डेटाबेसवर दिसला होता जिथून माहिती मिळाली होती की हा फोन एका यूनीएसओसी प्रोसेसर आणि 6 जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो. तसेच गीकबेंच लिस्टिंगनुसार, ब्लेज सीरीजचा अपकमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर चालू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here