240वॉट चार्जिंग असलेला Realme GT 3 लवकरच होऊ भारतात लाँच; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

Highlights

  • Realme GT 3 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट झाला आहे.
  • हा रियलमी फोन 240W SUPERVOOC Charge टेक्नॉलॉजीसह येतो.
  • हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 वर चालतो.

240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला Realme GT 3 5G फोन फेब्रुवारीमध्ये MWC 2023 च्या मंचावरून ग्लोबल मार्केटमध्ये आला होता. स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा मोबाइल आता लवकरच भारतीय बाजारात देखील एंट्री करू शकतो. रियलमी जीटी 3 स्मार्टफोन Bureau of Indian Standards (BIS) वर लिस्ट झाला आहे आणि ही लिस्टिंग समोर आल्यानंतर अंदाज लावला जात आहे की आता कंपनी लवकरच हा फोन भारतीय बाजारात सादर करू शकते.

टिपस्टर सुधांशूनं आपल्या ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे की Realme GT 3 स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स डेटाबेसमध्ये दिसला आहे. बीआयएसवर हा मोबाइल फोन RMX3709 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमधून फोनच्या फीचर, स्पेसिफिकेशन्स किंवा लाँच बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही परंतु एवढं स्पष्ट झालं आहे की हा रियलमी मोबाइल लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो.

रियलमी जीटी 3 चे स्पेसिफिकेशन्स

  • 240W SUPERVOOC Charge
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 6.74″ 1.5K 144Hz display
  • 50MP Triple Rear Camera
  • 4,600mAh Battery

रियलमी जीटी3 240वॉट स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के पंच-होल डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा रियलमी फोन 240वॉट सुपरवूक चार्ज टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे जी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात फोन बॅटरी फुल करू शकते. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,600एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच

फोटोग्राफीसाठी Realme GT3 240W ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात ओआयएस आणि एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल मायक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Nothing Phone (2) लवकरच येऊ शकतो भारतात; BIS वेबसाइटवर लिस्ट झाला फोन

Realme GT3 240W अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. हेवी टास्क व गेमिंग दरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी यात स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टम मॅक्स 2.0 देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here