Samsung Galaxy M15 5G ची प्रमुख माहिती गुगल प्ले कंसोलवर झाली लिस्ट, जाणून घ्या काय मिळू शकते खास

Highlights

  • Galaxy M15 5G SM-M156B मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • यात MediaTek Dimensity 6100+ चिपसेट मिळू शकते.
  • हा 50 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरासह ठेवला जाऊ शकतो.


सॅमसंगच्या एम सीरीज बजेट स्मार्टफोनसाठी ओळखला जातो. यात येणारा Samsung Galaxy M15 5G मागच्या अनेक दिवसांपासून सर्टिफिकेशन वेबसाईट आणि लीकमध्ये समोर येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी डिव्हाईस एकदम रिअल दिसणारे रेंडर पण समोर आले होते. तसेच, आता हा प्रमुख स्पेसिफिकेशन आणि फोटोसह गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये दिसला आहे. चला, पुढे तुम्हाला याची माहिती देत आहोत.

Samsung Galaxy M15 5G गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

  • Samsung Galaxy M15 5G चा मॉडेल नंबर SM-M156B सह गुगल प्ले कंसोल साईटवर दिसला आहे.
  • तुम्ही लिस्टिंग फोटोमध्ये पाहू शकता की डिव्हाईस मेमरीच्या बाबतीत 4GB रॅमसह सादर केला जाऊ शकतो.
  • गुगल प्ले कंसोल प्लॅटफॉर्मवर फोन MediaTek Dimensity 6100+ चिपसेट असलेला सांगण्यात आले आहे.
  • या चिपसेटसह काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एफ15 5G पण लाँच झाला आहे.
  • गुगल प्ले कंसोल लिस्टिंगनुसार पुष्टी झाली आहे की गॅलेक्सी एम15 5G लेटेस्ट अँड्रॉइड 14 ओएसवर आधारित असणार आहे.
  • फोनच्या फ्रंटला युजर्सना फुल एचडी+ डिस्प्ले पॅनल मिळण्याची गोष्ट पण समोर आली आहे.

Samsung Galaxy M15 5G चे (संभाव्य)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy M15 5G मध्ये 6.5 इंचाचा एफएचडी प्लस सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या स्क्रीनवर 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये काही लिस्टिंगनुसार MediaTek Dimensity 6100+ चिपसेट मिळण्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Mali G57-MP2 GPU लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत हा नवीन सॅमसंग मोबाईल 8GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. हेच नाही तर स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट पण मिळू शकतो.
  • कॅमेरा: या फोनमध्ये युजर्सना ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. जो रेंडरमध्ये पण समोर आला आहे. हा फोन 50 मेगापिक्सल प्रायमर, 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह ठेवला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा लेन्स असू शकते.
  • बॅटरी: Samsung Galaxy M15 5G मध्ये पावर बॅकअपसाठी मोठी चालणारी 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. याला चार्ज करण्यासाठी 25 वॉट चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो.
  • ओएस: डिव्हाईस लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित One UI वर आधारित असण्याची शक्यता आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here