CES 2023 इव्हेंटच्या माध्यमातून ThinkPhone लाँच; कंपनीनं सादर केला बिजनेस ग्रेड फोन

गेली कित्येक दिवस चर्चेत असलेला Motorola च्या ThinkPhone सीरिजच्या पहिल्या स्मार्टफोनचं अनावरण करण्यात आलं आहे. Lenovo ThinkPhone लास वेगसमध्ये सुरु असलेल्या CES 2023 इव्हेंटच्या माध्यमातून गुरुवारी जगासमोर ठेवण्यात आला आहे. हा एक बिजनेस ग्रेड स्मार्टफोन आहे. जो Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह बाजारात आला आहे.

विशेष म्हणजे या फोनमध्ये MIL STD 810H (मिल्ट्री ग्रेड) सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ असा की हा हँडसेट अनेक कठीण वातावरणात देखील टिकून राहू शकतो. यात Think 2 Think कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे त्यामुळे युजर्स प्रॉडक्टिव्हिटी टूल्सचा वापर या मोबाइलसह थिंकपॅड लॅपटॉपवर देखील करू शकतात. Motorola ThinkPhone ची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही.

Lenovo Motorola ThinkPhone ची उपलब्धता

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही महिन्यांमध्ये हा स्मार्टफोन यूएस, युरोप, दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील काही देशांमध्ये उपलब्ध होईल. कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा मात्र केला नाही. तसेच हा फोन भारतात लाँच होईल की नाही किंवा त्याची देशातील किंमत किती असेल याची माहिती देखली हाती लागली नाही.

Lenovo ThinkPhone ची डिजाईन

या स्मार्टफोनचा आकार आहे आणि यात टेक्स्चर पॅक पॅनल देण्यात आला आहे जो फ्रेममध्ये कर्व होतो. कंपनीनं यात एयरक्राफ्ट ग्रेड अल्युमिनियमचा वापर केला आहे, जो 1.25 मीटर उंचीवरील ड्रॉप देखील सहन करू शकतो. “ThinkPhone by Motorola” हे शब्द फोनच्या मागे खालच्या बाजूला उजवीकडे कोरण्यात आले आहेत, तर वरच्या बाजूला डावीकडे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट पॅनलवर पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. व्हॉल्युम रोकर आणि पावर बटन उजवीकडे तर एक लाल बटन डावीकडे देण्यात आला आहे.

Lenovo Motorola ThinkPhone चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला थिंकफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटची ताकद दिली आहे. जोडीला यात 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. यातील बॅटरीची अचूक माहिती मात्र देण्यात आली नाही. पण हा फोन 36 तासांची बॅटरी लाइफ देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह असल्याची चर्चा आहे. कंपनीनं सांगितलं आहे की थिंकफोनच्या बॉक्समध्ये 68W चा फास्ट चार्जर देण्यात आला येईल.

लेनोवो मोटोरोला थिंकफोनमध्ये 50MP अल्ट्रा पिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 13MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा थर्ड कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. ThinkPhone सोबत IP68 सर्टिफिकेशन मिळतं, त्यामुळे धुळीपासून हा फोन वाचतो, तर 1.5 मीटर पाण्यातही हा फोन 30 मिनिटे तग धरू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G सह Wi-Fi 6E चा सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here