Realme 12x 5G मोबाईलची लवकर होऊ शकते बाजारात एंट्री, या वेबसाईटवर झाला लिस्ट

Highlights

  • Realme 12x 5G भारतीय बाजारात लवकर सादर होऊ शकतो.
  • हा मोबाईल RMX3997 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • याला 5000 एमएएच बॅटरीसह आणले जाऊ शकते.

रियलमी सतत आपल्या नंबर 12 सीरीजमध्ये नवीन मोबाईल जोडत आहे. काही दिवसांपूर्वी रियलमी 12 आणि प्लस मॉडेल लाँच झाले होते. तसेच, आता यात Realme 12x 5G नावाने नवीन फोनची गोष्ट समोर आली आहे. हा ब्लूटूथ एसआयजी, बीआयएस आणि टीयूवी रिनलँड सेटिफिकेशन वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. ज्यामुळे याची भारतीय तसेच जागतिक मार्केटमध्ये सादर होण्याची शक्यता वाढली आहे. चला, पुढे सर्व लिस्टिंग सविस्तर जाणून घेऊया.

Realme 12x 5G ब्लूटूथ एसआयजी लिस्टिंग

  • Realme 12x 5G ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशनवर RMX3997 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • डेटाबेसमध्ये डिव्हाईस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.3 ला सपोर्टसह लिस्टेड आहे. त्याचबरोबर फोनचे नाव पण दिसून येत आहे.

Realme 12x 5G बीआयएस लिस्टिंग

  • बीआयएस लिस्टिंग पाहता फोन समान मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • बीआयएस डेटाबेसच्या माध्यमातून विशेष रूपाने कोणतीही अन्य स्पेसिफिकेशनच्या नावाची माहिती समोर आली नाही.
  • या प्लॅटफॉर्मवर आल्याने हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येईल.

Realme 12x 5G टीयूवी रिनलँड लिस्टिंग

  • Realme 12x 5G ला TUV रिनलँड सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर JPTUV-157768 सर्टिफिकेट नंबरसह पाहण्यात आले आहे.
  • सांगण्यात आले आहे की हा यामध्ये 4890 एमएएच रेटेड बॅटरी असणार आहे. परंतु लाँचच्या वेळी डिव्हाईसला सीरीजच्या अन्य फोनप्रमाणे 5000 एमएएच बॅटरीसोबत आणले जाऊ शकते.
  • या तिन्ही प्लॅटफॉर्मवर आल्याने एक गोष्ट समोर आली आहे की नवीन मोबाईल लवकर एंट्री घेऊ शकतो. आता पाहायचे आहे की ब्रँड कधी याची घोषणा करतो.

Realme 12 5G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Realme 12 5G मध्ये 6.72 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतो.
  • प्रोसेसर: Realme 12 5G मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6100 + 5G चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी कंपनीने Arm माली जी 57 MC2 जीपीयू आहे.
  • मेमरी: हा दोन स्टोरेज व्हेरिएंटवर लाँच करण्यात आला आहे. ज्यात 6 जीबी रॅम + 128 जीबी आणि 8जीबी रॅम +128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.
  • कॅमेरा: Realme 12 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा Samsung HM 6 प्रायमरी लेन्स, आणि 2 मेगापिक्सलचा आणखी पोर्ट्रेट कॅमेरा लेन्स मिळते. तसेच, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे.
  • बॅटरी: डिव्हाईसमध्ये 5000mAh बॅटरी मिळते. याला चार्ज करण्यासाठी 45 वॉट सुपरवूक चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here