टेक कंपनी आईटेल ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपला एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन आईटेल ए22 लॉन्च केला होता. कमी किंमतीती शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन देणारी हि कंपनी आज पुन्हा एकदा भारतीय बाजारात एक साथ तीन नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे. आईटेल ने आईटेल ए45, आईटेल ए22 आणि आईटेल ए22प्रो स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत. चला तर बघूया आईटेल च्या या स्मार्टफोंस मध्ये काय खास आहे:
आईटेल ए45
आईटेल ने हा फोन 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ आईपीएस फुलस्क्रीन डिस्प्ले सह सादर केला आहे. हा फोन एंडरॉयड गो आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर झाला आहे ज्याला लवकरच एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 64बिट 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सोबत मीडियाटेक एमटी6739 चिपसेट देण्यात आला आहे.
कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम सोबत 8जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल तसेच फ्रंट पॅनल, दोन्ही बाजूला 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा एक 4जी फोन आहे जो फिंगरप्रिंट सेंसर सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी यात ओटीजी सपोर्ट सोबत 2,700 एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.
आईटेल ए22
आईटेल ए22 480 x 854 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन पण कंपनी ने एंडरॉयड ओरियो सोबत एंडरॉयड गो एडिशन वर सादर करण्यात आला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 चिपसेट वर चालतो.
1जीबी रॅम सह हा फोन 8जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 32जीबी पर्यंत वाढवता येते. फोन च्या बॅक पॅनल वर 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनल वर 2-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट देण्यात अली आहे. 4जी वोएलटीई, फिंगरप्रिंट सेंसर व अन्य फीचर्स सोबत हा फोन 2,400एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
आईटेल ए22 प्रो
हा फोन आईटेल ए22 चाच मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 480 x 854 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5-इंचाचा आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. ए22 प्रो प्योर एंडरॉयड फोन आहे जो एंडरॉयड 8.1 ओरियो सह 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम तसेच 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 32जीबी पर्यंत वाढवता येईल. आईटेल ए22 प्रो चा कॅमेरा सेग्मेंट ए22 सारखाच आहे. 4जी वोएलटीई सोबत हा फोन फिंगरप्रिंट सेंसर व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 2,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
आईटेल ए45 5,999 रुपयांमध्ये मीडनाइट ब्लॅक, ग्रे आणि गोल्ड कलर मध्ये विकत घेता येईल.
आईटेल ए22 मीडनाइट ब्लॅक कलर सोबत स्पेस ग्रे आणि शॅम्पेन गोल्ड कलर मध्ये 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.
आईटेल ए22 प्रो मॅट ब्लॅक व शॅम्पेन गोल्ड सह रेड कलर वेरिएंट मध्ये 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
विशेष म्हणजे आईटेल चे हे तिन्ही फोन रिलायंस जियो च्या आॅफर अंतर्गत 2,200 रुपयांच्या कॅशबॅक सह सेल साठी उपलब्ध आहेत.














