रिलायन्स जियोनं आपल्या जियो फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. कंपनीनं या नवीन प्लॅनला Back-up Plan असं नाव दिलं आहे. प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे आणि यात अनलिमिटेड इंटरनेट डेटा दिला जाईल. डेटाची कोणतीही लिमिट नसेल हे स्पष्ट झालं आहे, हा प्लॅन खासकरून Tata IPLसाठी सादर करण्यात आला आहे. ग्राहकांना या प्लॅनसह 10Mbps पासून 100Mbps पर्यंतच्या स्पीड निवडता येईल. तसेच नवीन प्लॅन 30 मार्चपासून रिचार्ज करता येईल.
198 रुपयांचा जियोफायबर प्लॅन
JioFiber ब्रॉडबँड बॅक-अप प्लॅन फक्त 198 रुपये दरमहाच्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. तसेच तुम्हाला 10 एमबीपीएस पर्यंतच्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लँडलाइन कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्ये वनक्लिक स्पीड अपग्रेडची सुविधा देखील मिळत आहे. म्हणजे तुम्ही 1/2/7 दिवसांसाठी एक-क्लिक स्पीड अपग्रेड करू शकता आणि स्पीड 30 एमबीपीएस किंवा 100 एमबीपीएस पर्यंत वाढवू शकता. वन-स्पीड अपग्रेडेशनचा खर्च पाहण्यासाठी पुढील इमेज पाहा. हे देखील वाचा: मोफत बघा IPL! Jio नं Airtel, VI आणि BSNL युजर्सना दिली खास ऑफर
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रायमरी इंटरनेट कनेक्शनसाठी जर तुम्हाला 30 एमबीपीएस स्पीड हवा असेल तर एका दिवसासाठी 21 रुपये, 2 दिवसांसाठी 31 रुपये आणि 7 दिवसांसाठी 101 रुपये खर्च करावे लागतील. तसेच जर 100 एमबीपीएसचा स्पीड हवा असेल तर तुम्हाला 1 दिवसासाठी 32 रुपये 2 दिवसांसाठी 52 आणि 7 दिवसांसाठी 152 रुपये द्यावे लागतील. Jio Fiber Backup plan अंतगर्त 100 रुपये आणि 200 रुपयांच्या दोन प्लॅन देखील आहेत. यात 4K सेटटॉप बॉक्ससह 400 लाइव्ह टीव्ही चॅनेल, 6 ओटीटीचा समावेश आहे. हे देखील वाचा: 240वॉट चार्जिंग असलेला Realme GT 3 लवकरच होऊ भारतात लाँच; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट
बॅकअप प्लॅन कमीत कमी पाच महिन्यासाठी उपलब्ध आहे. हा घेण्यासाठी तुम्हाला 1490 रुपये (पाच महिन्यासाठी 990 रुपये आणि इन्स्टालेशनसाठी 500 रुपये) द्यावे लागतील. तसेच एसटीबी अपग्रेडसाठी पण तुम्हाला पाच महिन्यासाठी एकूण 500 रुपये किंवा 1000 रुपये मोजावे लागतील. हे सर्व युजरच्या प्लॅनवर अवलंबुन आहे. बिलवर अतिरिक्त जीएसटी देखील लागू होईल.