Realme Narzo 70 Pro 5G भारतात 19 मार्चला होईल लाँच, मिळेल अ‍ॅडव्हान्स Air Gesture फिचर

Realme कंपनी आपल्या ‘नारजो’ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडणार आहे. ब्रँडचा लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हान्स मोबाईल फोन Narzo 70 Pro 5G 19 मार्चला भारतात लाँच होईल. फोनच्या लाँचची तारिख तसेच यासोबतच कंपनीने याचे फोटो व काही फिचर्स पण ऑफिशियल केले आहेत, ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. तसेच या फोनमध्ये Sony IMX890 OIS Camera मिळेल.

Realme Narzo 70 Pro 5G च्या भारतातील लाँचची माहिती

कंपनीने अधिकृत घोषणा करत सांगितले आहे की येत्या 19 मार्चला भारतात लाँच इव्हेंट आयोजन करणार आहे ज्या मंचावरून नवीन नारजो स्मार्टफोन Narzo 70 Pro 5G भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. हा लाँच 19 मार्चला दुपारी 12 वाजता सुरु होईल ज्याला ब्रँड ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच शॉपिंग साईट Amazon वर पण लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

Air Gestures फिचर

हेडलाईनमध्ये आम्ही Air Gesture फिचरचा उल्लेख केला आहे, हाच या मोबाईलचा मोठा यूएसपी असेल. तसेच एअर जेस्चर एक अशी टेक्नोलॉजी आहे ज्यामुळे तुम्ही फोनला हात न लावता त्याच्या स्क्रीन व अ‍ॅप्सला नेविगेट करू शकता. जर तुमचे हाथ ओले असतील किंवा खराब असतील तर यावेळी फक्त बोट किंवा हात हालवून फोनला कमांड दिली जाऊ शकते. अ‍ॅप्स खोलणे-बंद करणे, स्क्रीन स्क्रॉलिंग, स्क्रीनशॉट, होम पेज अ‍ॅक्सेस सारखे काम फक्त ईशारा देऊन केले जातील.

Realme Narzo 60 Pro 5G भारतातील लाँचची माहिती

  • किंमत: या रियलमी फोनच्या 8GB RAM + 128GB Storage ला ₹23,999 मध्ये लाँच केले गेले होते. याच्या 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये तसेच 12GB RAM + 1TB Storage व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. अपेक्षा आहे नवीन Narzo 70 Pro 5G पण या रेंजमध्ये आणला जाईल.
  • डिस्प्ले: रियलमी नारजो 60 प्रो 5जी फोनमध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही कर्व्ड ओएलईडी स्क्रीन आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 1260 हर्ट्झ टच सेपलिंग रेट, 2160पीडब्ल्यू डिमिंग आणि 9500 निट्स ब्राइटनेस सारख्या फिचर्सला सपोर्ट करते. यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.
  • प्रोसेसर: Realme Narzo 60 Pro 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी हा मोबाईल फोन मीडियाटेक डायमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. हा प्रोसेसर पण 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे तसेच 2.6 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी रियलमी फोनमध्ये माली-जी68 जीपीयू देण्यात आला आहे.
  • कॅमेरा: Narzo 60 Pro 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 100 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल पोर्टरेट सेन्सर आहे. हा कॅमेरा ओआयएस आणि इन-सेन्सर झूम टेक्नॉलॉजीसह आहे. याच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे.
  • बॅटरी: रियलमी नारजो 60 प्रो 5जी फोन 5,000एमएएच बॅटरीवर लाँच झाला आहे. या फोनमध्ये 67 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे जी कंपनीनुसार बॅटरीला 8 मिनिटामध्ये 0 पासून 50% पर्यंत तसेच 47 मिनिटामध्ये 100 टक्के पर्यंत फुल चार्ज करू शकते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here