जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? 64MP कॅमेरा असलेला Oppo चा दमदार फोन फक्त 927 रुपयांमध्ये

Oppo लवकरच भारतात आपली नवीन फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन सीरिज Oppo Reno8 सादर करणार आहे. कदाचित म्हणूनच Oppo Reno7 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर स्वस्तात विकला जात आहे. जर तुम्ही शानदार कॅमेरा क्वॉलिटी असलेला फोन शोधत असाल तर तुम्ही या हँडसेटची निवड करू शकता. Oppo Reno7 5G स्मार्टफोनमध्ये सोनीचा हाय रिजोल्यूशन 64MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला Oppo Reno7 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती देत आहोत.

Oppo Reno7 5G वरील ऑफर्स

Oppo Reno7 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 28,999 रुपयांमध्ये लिस्ट आहे. या हँडसेटची खरेदी करताना ICICI, SBI, Axis, City, HSFC आणि Bank Of Baroda च्या कार्डनं पेमेंट केल्यास ग्राहकांना 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे या दमदार फोनची किंमत फक्त 25,999 रुपये होईल. या ओप्पो फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हे देखील वाचा: शाओमीला टक्कर देण्यासाठी OnePlus सज्ज! येतोय 16GB रॅम असलेला सर्वात पहिला स्मार्टफोन

तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी मोठी बचत करू शकता. हा डिस्काउंट तुमच्या स्मार्टफोनच्या कंडिशनवर अवलंबून असेल. इतकेच नव्हे तर तुम्ही हा डिवाइस मासिक हप्त्यांवर देखील विकत घेऊ शकता. ईकॉमर्स साईट फ्लिपकार्टवर Oppo Reno7 5G स्मार्टफोन फक्त 927 रुपयांच्या मासिक हप्त्यावर उपलब्ध आहे.

Oppo Reno7 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Oppo Reno7 5G स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा FullHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट दिलं आहे. तसेच सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. या फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देणाऱ्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट; कमी किंमतीत Snapdragon 888 प्रोसेसरसह फोन

OPPO Reno7 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबतीला 8MP ची वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP चा Sony IMX709 कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

ओप्पोचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायनसिटी 900 प्रोसेसरसह बाजारात येतो. त्याचबरोबर फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali G68 GPU चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा हँडसेट अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 12 वर चालतो. ओप्पोच्या या फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं फोन स्टेरी ब्लॅक आणि स्टारट्रेल्स ब्लू कलरमध्ये सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here