Infinix Note 40 series 18 मार्चला होणार जागतिक स्तरावर लाँच, सादर होऊ शकतात हे 4 मोबाईल फोन

काही दिवसांपूर्वी इनफिनिक्स नोट 40 प्रो+ स्मार्टफोनच्या रिटेल बॉक्सचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता ज्यात फोनचा लूक व अनेक महत्त्वाचे फिचर्स समोर आले होते. तसेच आता कंपनीने घोषणा केली आहे की नवीन Infinix Note 40 series 18 मार्चला लाँच होणार आहे. या दिवशी इनफिनिक्स आपला नवीन मोबाईल फोन जागितक मार्केटमध्ये सादर करणार आहे.

इनफिनिक्स नोट 40 सीरिज

कंपनीकडून सांगण्यात आले आहे की येत्या 18 मार्चला आपला ‘नोट 40 सीरिज’ जागतिक मार्केटमध्ये सादर करणार आहे. ब्रँडकडून अजून सीरिजमध्ये सामिल होणाऱ्या स्मार्टफोनच्या नावावरून पडदा उठविण्यात आले नाही, मात्र अंदाज लावला जात आहे की या दिवशी Infinix Note 40, Note 40 Pro, Note 40 Pro 5G आणि Note 40 Pro+ 5G फोन लाँच होणार आहे. परंतु Infinix Note 40 series भारतातील लाँचमध्ये अजून थोडे टाईम लागू शकतो.

Infinix Note 40 Price (लीक)

रिपोर्टनुसार इनफिनिक्स नोट 40 स्मार्टफोन 8 जीबी रॅमवर लाँच होईल तसेच यात 256जीबी स्टोरेज दिले जाईल. लीकमध्ये फोनची रशियन किंमत समोर आली आहे जी RUB 26,990 सांगण्यात आली आहे. या रशियन मॉडेलची किंमत भारतीय चलनानुसार 24,600 रुपयांच्या आसपास आहे.

Infinix Note 40 Pro Price (लीक)

इनफिनिक्स नोट 40 प्रो पाहता लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा मोबाईल फोन रशियात RUB 29,990 च्या किंमतीत लाँच केला जाईल. हा रशियाी रूबल भारतीय चलनानुसार जवळपास 27,300 रुपये आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम तसेच 256 जीबी स्टोरेज दिले जाणार आहे.

Infinix Note 40 series स्पेसिफिकेशन (लीक)

  • सीरिजचा बेस मॉडेल इनफिनिक्स नोट 40 स्मार्टफोन MediaTek Helio G91 चिपसेटवर लाँच केला जाईल.
  • तसेच इनफिनिक्स नोट 40 प्रो मध्ये MediaTek Dimensity 7020 चिपसेट दिले जाणार असल्याचे​ रिपोर्टमध्ये समोर आले आहे.
  • Infinix Note 40 Pro मध्ये 6.78 इंचाची पंच-होल अ‍ॅमोलेड स्क्रीन पाहायला मिळू शकते.
  • फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स नोट 40 प्रो मध्ये 108 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
  • लीकनुसार नोट 40 प्रो पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल.
  • तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी Note 40 Pro मध्ये 45वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
  • Note 40 Pro+ पाहता हा मोबाईल 100 वॉट फास्ट चार्जिंगवर लाँच होऊ शकतो.
  • इनफिनिक्स नोट 40 प्रो प्लसमध्ये वायरलेस चार्जिंग पण दिली जाऊ शकते जो फोनला या टेक्नोलॉजीसह ब्रँडचा पहिला मोबाईल बनविणार आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here