Mahindra Electric XUV 400 Launch: महिंद्रा अँड महिंद्रानं गेल्या महिन्यात 15 ऑगस्टला आपल्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक मॉडेल (Electric Vehicles) सादर केले होते. आता या महिन्यात 8 सप्टेंबरला Mahindra इलेक्ट्रिक मोबिलिटी डिव्हिजन Mahindra XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महिंद्रा ऑटोमोबाइलच्या नवीन इलेक्ट्रिक कार, महिंद्रा एक्सयूव्ही 400 चा एक टीजर शेयर केला आहे. चला जाणून घेऊया या नवीन इलेक्ट्रिक कारची संभाव्य किंमत आणि फीचर्स.
Mahindra XUV400 या दिवशी होईल लाँच
आनंद महिंद्रांनी गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी व्हिडीओ टीजर शेयर करून ट्वीट केलं, “आज एक खूप शुभ दिवस आहे, त्यामुळे लवकरच अजून एक लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे.” विशेष म्हणजे नवीन XUV400 इलेक्ट्रिक SUV ची टेस्ट ड्राईव्ह गेल्या काही आठवड्यांपासून सुरु होती. टेस्टिंगचे काही फोटो देखील याआधी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती
Today is a very auspicious day, so delighted to announce another curtain-raiser coming your way soon… pic.twitter.com/g0XG0wP3t0
— anand mahindra (@anandmahindra) August 31, 2022
Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत
Mahindra XUV400 काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Mahindra XUV400 कार 8 सप्टेंबर 2022 ला लाँच केली जाईल. लाँच झाल्यावर ही Tata Nexon EV Prime आणि Tata Nexon EV MAX ला टक्कर देईल. Mahindra XUV400 EV ची किंमत 15 लाख रुपये ते 18 लाख रुपये (सबसिडी आधी एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.
Mahindra XUV400 ची संभाव्य किंमत
XUV400 मोठ्या प्रमाणवर SsangYong Tivoli आधारित असेल, ज्यावर XUV300 ICE-संचालित SUV आधारित आहे. त्यामुळे XUV400 XUV300 पेक्षा जास्त लांब असेल आणि हिची लांबी जवळपास 4.2m असण्याची शक्यता आहे. XUV300 डायमेंशनल स्वरूपात बदलण्यात आली आहे आणि भारत सरकारकडून 4m लांबी असलेल्या वाहनांवरील कर लाभ मिळवण्यासाठी हिची लांबी 4m पेक्षा कमी करण्यात आली आहे.
जेव्हा प्रश्न कॉस्मेटिक्सचा येतो तेव्हा XUV400 Tivoli आणि XUV300 दोन्ही वेगळ्या ठरतात. XUV400 मध्ये ब्लँक्ड-आउट ग्रिल, कंटूरेड फ्रंट बंपर आणि त्रिकोणी फॉग लॅम्प हाउसिंग मिळण्याची शक्यता आहे. हेडलॅम्प क्लस्टर नव्याने तयार केला गेला आहे. मागील बाजूस, XUV400 मध्ये एलईडीसह रॅप-अराउंड टेल लॅम्पची एक जोडी आणि एक नवीन डिजाइन करण्यात आलेलं टेलगेट मिळेल. साइड प्रोफाईल नवीन अलॉय व्हील्सद्वारे वाढवण्यात येईल आणि XUV400 मध्ये 17-इंचाचा मोठा अलॉयचा एक सेट मिळू शकतो. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच
XUV400 मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे जी पुढील चाकांना चालवेल आणि जवळपास 150bhp ची पीक पावर देईल. बॅटरी क्षमतेनुसार दोन पर्याय असतील. XUV400 मध्ये एक अपग्रेडेड इंफोटेनमेंट सिस्टम मिळण्याची शक्यता आहे आणि यात ADAS फंक्शंससह लेटेस्ट ADRENOX प्लॅटफॉर्म देखील मिळू शकतो.