Maruti सादर करणार Electric WagonR; सिंगल चार्जवर धावणार 180 किलोमीटर

Image: Abhishek Panjoo

अलीकडेच Maruti Suzuki WagonR Electric हॅचबॅक टेस्टिंग दरम्यान स्पॉट करण्यात आली आहे. याआधी देखील या कारची टेस्टिंग सुरु असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच त्यानंतर काही मीडिया रिपोर्ट्समधून दावा करण्यात आला होता की कंपनी ही इलेक्ट्रिक कार सादर करणार नाही. परंतु आता पुन्हा एकदा मारुतीच्या नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग सुरु असल्याचं दिसलं आहे. त्यामुळे या आगामी Maruti Electric Car च्या डिजाइनची बरीचशी माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया सविस्तर…

Maruti WagonR Electric ची डिजाइन

नवीन मारुती वॅगनआर इलेक्ट्रिकच्या इंटीरियरची माहिती अजूनतरी समोर आली नाही. परंतु Maruti WagonR Electric ची बाह्य डिजाइन आणि स्टाइलमध्ये कंपनीनं कोणताही जास्त बदल केलेला नाही. इलेक्ट्रिक मॉडेल देखील पेट्रोल-डिझल मॉडेल सारखा दिसत आहे. कारच्या फ्रंटला थोडा बदल करण्यात आला आहे, ज्यात एक पातळ, नवीन डिजाइन असलेली ग्रिल आणि हेडलॅम्प्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फ्रंट आणि रियर बंपर देखील अपडेट करण्यात आलं आहे. फ्रंट यूनिटमध्ये फॉग लॅम्प असेंबली देखील नवीन मिळू शकते. हे देखील वाचा: OLA पेक्षा जास्त रेंज असलेली शानदार Electric Scooter भारतात लाँच; किंमत मात्र परवडणारी

Image: Abhishek Panjoo

या कारचं केबिन लेआउट आणि बरेचशे फिचर पेट्रोल आणि डिझेल मॉडेलसारखे असतील. रिपोर्ट्सनुसार यात अपडेटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, नवीन गियर सिलेक्टर, नवीन एयर-कॉन कंट्रोल आणि वर्टिकली स्टॅक्ड एसी वेंट दिले जाऊ शकतात. Electric WagonR च्या पावरट्रेनची विशेष माहिती मिळाली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात 72V इलेक्ट्रिक ड्राईव्ह आणि 10.25kWh लिथियम-आयन बॅटरीपॅक मिळू शकतो. जी फुल चार्जवर 180 किलोमीटर पर्यंतची रेंज देऊ शकते. हे देखील वाचा: ‘No Network’ मध्ये देखील फोनवरून करता येतो कॉल; जाणून घ्या ही शानदार ट्रिक

Maruti WagonR Electric ची लाँच डेट

Maruti Suzuki नं सांगितलं आहे की त्यांची पहिली Electric Car 2025 मध्ये लाँच होईल. यासाठी मारुतीच्या गुजरात प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यात येईल. काही रिपोर्टनुसार कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांपेक्षा जास्त असेल. परंतु कंपनीनं अजूनतरी WagonR EV च्या भारतीय लाँचची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Maruti Suzuki सोनीपत, हरियाणामध्ये दोन नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरु करण्याची तयारी करत आहे. या प्रोजेक्टसाठी सुरुवातीला 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. पहिला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट 2025 मध्ये सेटअप केला जाईल. त्यानंतर दुसरा प्लांट एक वर्षांनी सक्रिय होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here