OnePlus Ace 3V 19 मार्चला होईल चीनमध्ये लाँच, OnePlus Nord CE 4 नावाने येऊ शकतो भारतात

OnePlus Nord CE 4 1 एप्रिलला भारतात लाँच होईल. हा मोबाईल येण्याच्या आधी कंपनी आपल्या होम मार्केट चीनमध्ये अजून एक नवीन मोबाईल OnePlus Ace 3V सादर करणार आहे. हा स्मार्टफोन 19 मार्चला चीनमध्ये लाँच केला जाणार असल्याची बातमी आहे. चीनमध्ये लाँचच्या आधी फोनची चर्चा यामुळे होत आहे की, कारण वनप्लस फोन भारतात OnePlus Nord CE 4 किंवा OnePlus Nord 4 नावाने लाँच होऊ शकतो.

OnePlus Ace 3V स्पेसिफिकेशन (लीक)

  • 1.5K 120Hz OLED display
  • Qualcomm Snapdragon 7+ Gen 3
  • Upto 16GB RAM
  • 50MP OIS rear camera
  • 16MP front camera
  • 5,500mAh battery
  • 100W Fast Charging
  • स्क्रीन: वनप्लस ऐस 3वी बद्दल सांगण्यात आले आहे की हा मोबाईल फोन 1.5 रेजोल्यूशन असणाऱ्या स्क्रीनवर लाँच केला जाऊ शकतो जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल. तसेच या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण पाहायला मिळेल.
  • प्रोसेसर: हा मोबाईल अँड्रॉइड 14 ओएसवर लाँच केला जाईल. लीकनुसार वनप्लस ऐस 3वी मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 732 जीपीयूला सपोर्ट करेल.
  • मेमरी: लीकनुसार वनप्लस आपल्या या मोबाईल फोनला 16 जीबी रॅमवर लाँच करेल. या मॉडेलमध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी OnePlus Ace 3V मध्ये 50 मेगापिक्सल ओआयएस रियर कॅमेरा दिला जाणार असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे. सेल्फी काढणे, रिल्स बनविण्यासाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह कर बाजारात आणला जाऊ शकतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी या वनप्लस मोबाईलमध्ये 5,500 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 100 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह आणले जाऊ शकते.

OnePlus Nord CE 4 भारतातील लाँचची माहिती

वनप्लस नॉर्ड सीई 4 5जी फोन 1 एप्रिलला भारतात लाँच होईल. या लाँचचा कार्यक्रम 1 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, ज्याला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट सोबतच शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर लाईव्ह प्रसारित केले जाईल. ब्रँडकडून सांगण्यात आले आहे OnePlus Nord CE 4 ला Dark Chrome आणि Celadon Marble कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here