गुगलच्या पिक्सल सीरिजचा नवीन स्मार्टफोन Google Pixel 8a येत्या काही महिन्यामध्ये सादर होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिव्हाईस बद्दल माहिती समोर आली आहे. फोन ब्लूटूथ एसआयजी सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. तसेच, आता मोबाईलची लाँच टाईमलाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमत रेंज टिपस्टर द्वारे शेअर करण्यात आली आहेत. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.
Google Pixel 8a लाँच टाईमलाइन आणि किंमत रेंज (लीक)
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर योगेश बरारने Google Pixel 8a बाबत माहिती शेअर केली आहे. ज्यात लाँच टाईमलाईन, स्पेसिफिकेशन आणि किंमत रेंज समोर आली आहे.
- तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की Google Pixel 8a मोबाईलमध्ये लाँच होण्याची माहिती सांगितली आहे.
- फोन संभाव्य 14 मे च्या दिवशी Google I/O 2024 कार्यक्रमामध्ये लाँच केला जाऊ शकतो.
- लीकनुसार स्मार्टफोनची किंमत 500 ते 550 डॉलर म्हणजे जवळपास 41,600 रुपये ठेवली जाऊ शकते. ही किंमत रेंज वेगवेगळ्या मार्केटनुसार वर खाली असू शकते.
Google Pixel 8a
– 6.1" FHD+ OLED, 120Hz
– Tensor G3
– 128/256GB storage
– 64MP (OIS) + 13MP (UW)
– 13MP selfie
– Android 14
– 4,500mAh (~)
– 27W chargingLaunch: May ($500-550)
What are your price expectations?
— Yogesh Brar (@heyitsyogesh) April 5, 2024
Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन (लीक)
- डिस्प्ले: टिपस्टर योगेश बरारनुसार Google Pixel 8a मध्ये 6.1-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाई रिजॉल्यूशनला सपोर्ट मिळू शकतो.
- प्रोसेसर: गुगल पिक्सल 8 ए स्मार्टफोनला ब्रँड परफॉरमेंससाठी Tensor G3 चिपसेटवर आधारित ठेवला जाऊ शकतो. ही चिप पूर्व मॉडेल Pixel 8 मध्ये पण देण्यात आली आहे.
- स्टोरेज: स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंट मध्ये बाजारात येऊ शकतो. ज्यात 128GB आणि 256GB स्टोरेजचा समावेश आहे.
- कॅमेरा: सांगण्यात आले आहे की नवीन गुगल Pixel 8a मध्ये OIS सह ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा लावला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
- बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि याला लवकर चार्ज करण्यासाठी 27W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट प्रदान केला जाऊ शकतो.
- ओएस: Google Pixel 8a मोबाईल लेटेस्ट अँड्रॉइड 14 वर आधारित असण्याची शक्यता आहे.













