Realme UI भारतात झाला लॉन्च, ऍडव्हान्स फीचर्स सह आता अजून शानदार बनतील रियलमी फोन, जाणून घ्या कधी होईल तुमचा फोन अपडेट

गेल्याच आठवड्यात Xiaomi ने अधिकृतपणे घोषणा करून सांगितले होते कि कंपनी आपल्या यूजर इंटरफेसच्या नवीन वर्जन वर काम करत आहे जो MIUI 12 नावाने सादर केला जाईल. नवीन मीयूआई 12 येत्या काही महिन्यांत रोलआउट केला जाईल. Xiaomi च्या या बातमीनंतर फक्त 3 दिवसांनी कंपनीच्या कट्टर प्रतिस्पर्धी Realme ने पण आपल्या यूजर इंटरफेस बद्दल मोठी घोषणा केली आहे. रियलमीने आज भारतीय बाजारात आपला लेटेस्ट यूजर इंटरफेस Realme UI लॉन्च केला आहे. Realme UI रोलआउट करताना रियलमीने संपूर्ण यादी जाहीर केली आहे कि ब्रँडच्या कोणत्या स्मार्टफोनला कधी हा ऍडव्हान्स फीचर असलेल्या यूआई वर अपडेट केले जाईल.

सर्वात अशी सांगायचे तर Realme UI एंडरॉयडच्या नवीन आणि पावरफुल ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 10 सह काम करेल. Realme UI ऍडव्हान्स फीचर्स सह येईल. फक्त ब्रँडचे आगामी स्मार्टफोन या यूआई सह बाजारात येतील असे नई तर कंपनी वेगवेगळ्या वेळी आपले जुने स्मार्टफोन्स पण Realme UI ने सुसज्ज करेल. Realme UI सोबत रियलमीच्या जुन्या स्मार्टफोन्सना एंडरॉयड 10 चा अपडेट पण मिळेल.

हे Realme फोन होतील रियलमी यूआई ने सुसज्ज :-

Realme UI चे अपडेशन या महिन्यापासून ब्रँडच्या स्मार्टफोन्सना मिळायला सुरवात होईल. Realme XT कंपनीचा पहिला स्मार्टफोन असले जो रियलमी यूआई वर अपडेट होईल. या फोन सह Realme 3 Pro पण जानेवारी महिन्यातच Realme UI ने सुसज्ज होतील.

फेब्रुवारी मध्ये Realme X आणि Realme 5 Pro स्मार्टफोन रियलमी यूआई वर अपडेट केले जातील.

Realme X2 आणि Realme X2 Pro स्मार्टफोनला मार्च महिन्यात Realme UI चा अपडेट मिळेल.

Realme 3 आणि Realme 3i यूजरना एप्रिल मध्ये Realme UI अपडेट मिळेल. Realme 2 Pro ला पण या दरम्यान रियलमी यूआई अपडेट मिळेल.

कंपनी मे मध्ये Realme 5, Realme 5i आणि Realme 5s स्मार्टफोनला रियलमी यूआई चा अपडेट देईल.

Realme ने सांगितले कि कंपनी Realme C2 तसेच इतर बाकी स्मार्टफोन्सना साल 2020 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत Realme UI अपडेट मिळेल.

ऍडव्हान्स असतील फीचर्स :-

रियलमीचे सध्याचे स्मार्टफोन OPPO च्या ColorOS वर चालतात. Realme UI मध्ये कंपनीने अनेक फीचर्स कलरओएस पेक्षा वेगळे आणि ऍडव्हान्स बनवले आहेत. रियलमी यूआई ची डिजाईन कलरओएस पेक्षा खूप वेगळी असेल. Realme UI हाई-ब्राइटनेस कलर आणि हाई-सेच्यूरेशन सह येईल जे याला शानदार विजुअल इफेक्ट्स देतील तसेच फोन मध्ये इफेक्टिव कलर आउटपुट पण देतील.

Realme UI मध्ये ऍप आइकन्स आर्कषक असतील तसेच मोबाईल यूजर्स पण आपल्या आवडीनुसार या आइकन्सची डिजाईन आणि आकार बदलू शकतील. हे आइकन्स गोल, चौकोनी, लांब व रुंद करता येतील. तसेच रियलमी यूआई मध्ये आइकन्सच्या आतील ग्राफिक्स पण बदलता येतील. Realme UI मध्ये कंपनीने 11 नवीन वालपेपर्सचा समावेश केला आहे जे निसर्गापासून प्रेरित आहेत.

Realme UI मध्ये Quantum Animation Engine देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि या फीचर मुळे मोबाईल डिस्प्ले सॉफ्ट आणि फोन मधील ऍनिमेशन्स स्मूद करता येतील. हा फीचर मोबाईलचा जास्त काळ वापर करताना डोळ्यांना जास्त त्रास देणार नाही. Realme UI मध्ये अनेक नवीन मोड्स पण देण्यात आले आहेत ज्यात Focus Mode, 3-finger screenshot, Personal Information Protection, power-saving इत्यादींचा समावेश आहे. महत्वाची बाब अशी कि Realme UI एंडरॉयड 10 सह चालेल आणि त्यामुळे फोन खूप स्मूद आणि लॅग-फ्री चालेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here