3,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy A50s आणि Galaxy A70s, जाणून घ्या कुठून घेता येतील विकत

Galaxy A50s

Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि लवकरच या सीरीज अंतर्गत Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. या दोन्ही स्मार्टफोन्सचे प्रोडक्ट पेज पण सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर आले आहेत. पण हे दोन्ही फोन्स भारतीय बाजारात येण्याआधी कंपनीने या सीरीज मधील स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A70s ची किंमत कमी केली आहे. Samsung चे हे दोन्ही स्मार्टफोन्स आता 3,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट सह स्वस्तात ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येतील.

Samsung Galaxy A50s आणि Galaxy A70s च्या खरेदीवर कंपनी 3,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्याचा फायदा जवळच्या मोबाईल दुकानावर किंवा रिटेल स्टोर्स वर जाऊन घेता येईल. Galaxy A70s बद्दल बोलायचे तर फोनचा 28,999 रुपयांचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3,000 रुपयांच्या कॅशबॅक सह येतो आणि 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे गॅलेक्सी ए70एस चा 30,999 रुपयांचा 8 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट आता 27,999 रुपयांमध्ये मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50एस पाहता 21,999 रुपयांच्या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट वर कंपनी 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्यामुळे हा वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy A50s चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट जर व्हाईट कलर मध्ये विकत घेतला तर यावर पण 2,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि फोन 19,999 रुपयांच्या ऐवजी 17,999 रुपयांमध्ये घेता येईल. तसेच या वेरिएंटच्या ब्लॅक तसेच वॉयलेट कलर मॉडेल वर कंपनी 1,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्यामुळे हा 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A50s

हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो क्वॉड 2.3गीगाहर्ट्ज + क्वॉड 1.7गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट चालतो. Galaxy A50s कंपनीने 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. हे दोन्ही रॅम वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy A50s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर Galaxy A50s 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी गॅलेक्सी ए50एस मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A50s मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरी सह येतो.

Samsung Galaxy A70s

सॅमसंगच्या या फोन मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन FHD+ (1080×2400) AMOLED आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसर आणि 6 जीबी/8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये F 1.8 अपर्चर असलेला 64-मेगापिक्सल कॅमेरा, 5-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल सेंसर आहे. तसेच फ्रंटला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन डुअल-सिम सपोर्ट सह येईल. याचे डाइमेंशन 164.2×76.7×7.9 मिलीमीटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here