Samsung Galaxy F55 5G लवकर होऊ शकतो लाँच, गुगल प्ले कंसोलवर झाला लिस्ट

सॅमसंग आपल्या एफ-सीरिजच्या प्रोडक्ट पोर्टफोलियो पुढे वाढवणार आहे. यात Samsung Galaxy F55 5G लवकर लाँच असण्याची शक्यता आहे. तसेच याच्या सादर होण्याची बातमी यामुळे पण मार्केटमध्ये आली आहे कारण हा गुगल प्ले कंसोल सर्टिफिकेशनमध्ये प्रमुख स्पेसिफिकेशन आणि एक फोटोसह समोर आला आहे. चला, पुढे लिस्टिंगची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy F55 5G गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

  • 91 मोबाईलने Samsung Galaxy F55 ला गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये स्पॉट केले आहे.
  • लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की नवीन डिव्हाईसचा मॉडेल नंबर SM7450 आहे. हा फोन Galaxy M55 चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. डिझाईन व्यतिरिक्त डिव्हाईसमध्ये एक प्रोसेसर आहे.
  • या वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार Samsung Galaxy F55 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट लावला जाऊ शकतो. हा 4nm प्रक्रियावर आधारित आहे.
  • गुगल प्ले कंसोलवर समोर आले आहे की फोनमध्ये 8GB रॅमची पावर दिली जाऊ शकते.
  • फोनच्या फ्रंटला फुल HD+ डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता नवीन मोबाईल अँड्रॉईड 14 वर आधारित वन युआय 6.0 वर काम करू शकतो.

Samsung Galaxy F55 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Samsung Galaxy F55 5G मोबाईलमध्ये युजर्सना 6.7-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स पीक ब्राइटनेस मिळू शकते.
  • प्रोसेसर: फोनमध्ये परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची संभवाना आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात OIS सह 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा लावला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 50MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: बॅटरीसाठी या डिव्हाईसमध्ये 25W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टमबाबत बोलले तर हा फोन अँड्रॉईड 14 आधारित वन युआय 6.0 रन करू शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here