WhatsApp Call Links म्हणजे नेमकं काय? कधी सुरु होणार? जाणून घ्या सर्वकाही

What Is Whatsapp Call Links Features Check Details

WhatsApp Call Links: Meta प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झकबर्गनं अलीकडेच लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरला कंपनीनं कॉल लिंक (Call Links) असं नाव दिलं आहे. या फीचरच्या मदतीनं युजर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ कॉल आणि ऑडियो कॉलसाठी डायरेक्ट लिंक बनवू शकतात. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडीओ आणि ऑडियो कॉलमध्ये एकाच वेळी 32 युजर्स जोडले जाऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स एन्ड टू एन्ड इनक्रिप्टेड व्हिडीओ कॉल करू शकतील.

WhatsApp Call Links: म्हणजे काय आणि उपयोग काय?

पॉपुलर व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग प्लॅटफॉर्म जसे की – Google Meet, Zoom, आणि Microsoft Teams मध्ये एक युनिक कॉल लिंक जनरेट केली जाते. या लिंकवर क्लिक करून युजर्स थेट कॉलमध्ये जोडले जाऊ शकतात. हे फीचर आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील येणार आहे. कॉल लिंक्सच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅप युजर्स लिंक व्हिडीओ आणि ऑडियो कॉलसाठी लिंक शेयर करू शकतील. हे देखील वाचा: मोटोरोलानं लाँच केला 10499 रुपयांचा स्वस्त मोबाइल; 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

What Is Whatsapp Call Links Features Check Details

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फिचर लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मच्या युजर्ससाठी लाइव्ह होईल. हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिस्टच्या कॉल टॅबमध्ये दिसेल. इथे युजर्स व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी लिंक जनरेट करता येईल. तसेच कॉल शेड्यूल देखील करता येईल. ही लिंक दुसऱ्या युजर्सना किंवा ग्रुपमध्ये पाठवता येईल. लिंकवर क्लिक करून इतर युजर्स आपल्या सोयीनुसार कनेक्ट करू शकतील.

WhatsApp नं कॉल लिंक्स फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. कॉल लिंक जनरेट करण्याच्या काही मर्यादा आहेत. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जनरेट करण्यात आलेल्या कॉल लिंक 90 दिवसांनी एक्सपायर होतील. असे युजर्स जे व्हॉट्सअ‍ॅप वापरत नाहीत ते या लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड देखील करू शकतील.

What Is Whatsapp Call Links Features Check Details

व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलमध्ये जोडता येतील 32 मेंबर्स

Whatsapp सध्या इंक्रिप्टेड व्हिडीओ कॉलमध्ये 32 लोकांना समाविष्ट करण्याचं फीचर्स टेस्ट करत आहे. कंपनी या फीचरवर एप्रिलपासून काम करत आहे. 32 लोकांच्या व्हिडीओ कॉलचं फीचर कधी पर्यंत रोलआउट केलं जाईल, याची माहिती मात्र मिळाली नाही. फिचर लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल, अशी शक्यता आहे. हे देखील वाचा: Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या व्हिडीओ कॉलमध्ये 8 युजर्स सहभागी होऊ शकतील. टेलीग्राम सारख्या दुसऱ्या अ‍ॅप्समध्ये 1000 युजर्स एकाच वेळी व्हिडीओ कॉल करू शकतात. तसेच WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर कॉम्यूनिटी फीचर देखील टेस्ट करत आहे. हे फीचर मल्टीपल ग्रुपचे अ‍ॅडमिन कॉम्यूनिटी क्रिएट करू शकतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here