बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

लो बजेट स्मार्टफोन्स सादर करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत. तरीही शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीनं शानदार फीचर्स असलेले स्मार्टफोन सादर करून आपलं नाव राखलं आहे. अलीकडेच 6,499 रुपयांच्या Xiaomi स्मार्टफोन Redmi A1 नं भारतात एंट्री केली होती. लो बजेट सेग्मेंटमध्ये आलेल्या रेडमी ए1 मध्ये MTK Helio G22 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात स्वस्त रेडमी ए1 ची विक्री सुरु झाल्यानंतर आता बातमी येत आहे की कंपनी या मोबाइल फोनचा अजून एक अ‍ॅडव्हान्स व्हर्जन Redmi A1+ सादर करण्याची तयारी करत आहे.

Redmi A1+ Launch

रेडमी ए1+ बाबत आतापर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु हा स्मार्टफोन विविध सर्टिफिकेशन्स साइट्सवर स्पॉट केला गेला आहे. एका ताज्या रिपोर्टमध्ये Redmi A1+ च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. रेडमी ए1प्लस भारतात लाँच झालेल्या रेडमी ए1 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल ज्यात अनेक फीचर्स अपग्रेड केले जातील. हे देखील वाचा: 5G Launch: 4 दिवसांनी सुरु होणार 5G सर्व्हिस? की त्यापेक्षा जास्त वेळ लागणार, जाणून घ्या

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

Redmi A1+ Specifications

रिपोर्टनुसार हा रेडमी मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल जो 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल. लीकनुसार Redmi A1+ black, light blue आणि light green कलरमध्ये लाँच होईल. या फोनमध्ये 3.5एमएम जॅक व रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाईल.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा मोबाइल 2GB LPDDR4X RAM ला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल सिम, वीओवायफाय, ब्लूटूथ 5.0 तसेच 2.4गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल.

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

लीकनुसार फोटोग्राफीसाठी रेडमी ए1प्लसच्या बॅक पॅनल सिंगल रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो 8 मेगापिक्सलचा असेल. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये 5,000एमएएच बॅटरी असू शकते जी 10वॉट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 5G Mobile च्या किंमतीत विकत घ्या इलेक्ट्रिक सायकल; सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंज

Redmi A1 Plus Price

Redmi A1 Plus स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु या स्मार्टफोनची किंमत 10 रुपयांच्या आत असू शकते. काही दिवसांपूर्वी आलेला Redmi A1 पेक्षा या स्मार्टफोनची किंमत नक्कीच जास्त असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here