10 हजार रूपयांपेक्षा पण स्वस्त Realme C65 5G फोन होत आहे भारतात लाँच, येथे पाहा लाईव्ह

रियलमीचा 5 जी फोन Realme C65 5G 26 एप्रिलला भारतात लाँच होणार आहे. कंपनी याला ‘fastest entry-level 5G phone’ म्हणत आहे, कारण की मोबाईलमध्ये मिळणारी प्रोसेसिंग आणि फास्ट चार्जिंग, 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये येत असलेल्या रियलमी सी 65 5 जी ची भारतातील लाँच माहितीसह फोनची इतर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Realme C65 5G लाँच लाईव्ह

रियलमी सी 65 5 जी फोन 26 एप्रिलला भारतात रिलीज होईल. दुपारी 12 वाजता कंपनी एका वचुर्अल कार्यक्रमाचे आयोजन करेल तसेच या कार्यक्रमामध्ये फोनचे फिचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली जाणार आहे, सोबतच Realme C65 5G ची किंमत व सेलच्या माहितीवरून पडदा उठविला जाईल. रियलमी भारताच्या अधिकृत वेबसाईट सोबतच युट्युब चॅनेलवर पण हा कार्यक्रम लाईव्ह चालेल. तसेच ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण रियलमी सी 65 5 जी भारतातील लाँच लाईव्ह दिसेल.

Realme C65 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.67″ 120 हर्ट्झ एलसीडी डिस्प्ले
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 6 जीबी डायनॅमिक रॅम
  • 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
  • 15 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

स्क्रीन : रियलमी सी 65 5 जी फोनला 6.67 इंचाच्या डिस्प्लेवर लाँच केले जाऊ शकते. ही पंच-होल स्टाईल असणारी स्क्रीन असेल, जी एलसीडी पॅनलवर बनली आहे, तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल. यात 950 निट्स ब्राईटनेस पण पाहायला मिळू शकते.

प्रोसेसर : लीकनुसार Realme C65 5G फोन मीडियाटेक डाईमेंसिटी 6300 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच होईल. ही 6 नॅनोमीटर फॅ​ब्रिकेशनवर बनलेली मोबाईल चिपसेट आहे.

मेमरी : रियलमी सी 65 5 जी फोनबद्दल सांगण्यात आले आहे की हा तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. यामध्ये 4GB+64GB, 4GB+128GB आणि 6GB+128GB सहभागी होतील. तसेच फोनमध्ये 6 जीबी वचुर्अल रॅम पण पाहायला मिळू शकते.

कॅमेरा : Realme C65 5G फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की यात 50 मेगापिक्सल मेन सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स दिली जाईल. तसेच मोबाईलच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर मिळेल.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी 65 5 जी फोनला 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले गेले आहे. लीकनुसार फोनमध्ये 15 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण मिळेल.

इतर फिचर्स : रियलमी सी 65 5 जी फोनला आयपी 54 रेटिंगसह बाजारात आणले जाईल. यात रेनवॉटर स्मार्ट टच, आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स पण मिळण्याची गोष्ट लीकमध्ये समोर आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here