Motorola Razr 50 आणि Razr 50 Ultra 5G चा लूक आणि स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या काय आहे खास

मोटोरोलाच्या फ्लिप फोनला आतापर्यंत भारतासह जागतिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे लक्षात घेऊन लवकरच Razr 50 सीरिज लाँच होणार आहे. यात Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra 5G मोबाईल सादर केले जाऊ शकतात. तसेच, लाँचच्या आधी 91 मोबाईलला दोन्ही डिव्हाईसचे रेंडेर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे डिझाईन आणि फिचर्स बाबत लीक झालेली सविस्तर जाणून घेऊया.

Motorola Razr 50 5G, Razr 50 Ultra 5G रेंडर्स (लीक)

  • 91 मोबाईलला Motorola Razr 50 5G आणि Motorola Razr 50 Ultra 5G चे रेंडर आणि स्पेसिफिकेशन टिपस्टर सुधांशु अंबोरे द्वारे मिळाले आहेत.
  • मोटोरोला रेजर 50 लीकमध्ये ग्रे आणि खाकी सारख्या दोन कलरमध्ये दिसला आहे. तर रेजर 50 अल्ट्रा पीच फज, ग्रीन आणि ब्लू कलर्स मध्ये समोर आला आहे.
  • मोटोरोला ब्रँड या कलर्स लाँचच्या वेळी काही वेगळ्या नावाने मार्केटमध्ये आणले जाऊ शकतात.
  • रेंडर्सनुसार दोन्ही फोनच्या कव्हर स्क्रीनवर कॅमेरा लेन्ससाठी वेगवेगळ्या कटआऊट आहेत.
  • वेनिला रेजर 50 5G मध्ये अल्ट्रा मॉडेलच्या तुलनेत इनर स्क्रीनवर पातळ बेजल असू शकतात.
  • अल्ट्रा मॉडेलवर कव्हर स्क्रीन मोठी आहे. असे वाटत आहे की यात पातळ बेजेल्स पण आहेत.
  • बॅक पॅनलवर दोन्ही मॉडेलमध्ये खालच्या बाजूला कंपनीची ब्रँडिंग पण पाहिली जाऊ शकते.

Motorola Razr 50 5G, Razr 50 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिस्प्ले: Motorola Razr 50 5G आणि Razr 50 Ultra 5G स्मार्टफोनमध्ये FHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, SGS लो ब्लू लाईट सर्टिफाईड आणि SGS लो मोशन ब्लर सर्टिफाइड टेक्नॉलॉजीसह 6.9 इंचाची प्रायमरी स्क्रीन मिळू शकते. कव्हर स्क्रीन पाहता रेजर 50 मध्ये 3.63-इंचाचा आणि रेजर 50 अल्ट्रा 4-इंचाचा pOLED FHD+ रिजॉल्यूशन डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: Motorola Razr 50 5G मध्ये MediaTek Dimensity 7300X आणि Razr 50 Ultra 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट असू शकते.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत Motorola Razr 50 5G मध्ये 8GB RAM+ 256GB स्टोरेज आणि Motorola Razr 50 Ultra 5G मध्ये 12GB RAM+ 512GB स्टोरेज दिला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: मोटोरोला रेजर 50 5G ला 50MP प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. तर रेजर 50 अल्ट्रामध्ये 50MP च्या मोठ्या सेकंडरी कॅमेरा व्यतिरिक्त समान कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
  • बॅटरी: मोटोरोला रेजर 50 मध्ये 4,200mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच, रेजर 50 अल्ट्रामध्ये 45W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 4,000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here