HMD Pulse, Pulse+, Plus Pro आणि HMD Vibe सारखे स्मार्टफोनसह ‘एचएमडी ग्लोबल’ ने आपली नवीन एक नवीन इनिंग सुरू केली आहे. Nokia ब्रँड पुढे वाढवत ही टेक कंपनी आता भारतात पण नवीन HMD Phone आणणार आहे. तसेच आता या ब्रँडची सर्व नवीन बातमी समोर येत आहे, कंपनी Nokia Lumia phone च्या नवीन व्हर्जनवर काम करत आहे ज्याला लवकरच सादर केले जाऊ शकते.
फोन एचएमडी ग्लोबल द्वारे बनविले जात असून या नवीन स्मार्टफोनची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. सध्या हा खुलासा झाला नाही, नोकिया लुमियाचा हा नवीन व्हर्जन कोणत्या नावाने मार्केटमध्ये एंट्री घेईल, परंतु लीकमध्ये या फोनचे स्पेसिफिकेशन शेअर करण्यात आले आहे. याची पुष्टी झाली आहे की हा मोबाईल आता Nokia नाही तर HMD टाईटल सह आणला जाईल.
HMD Lumia Phone (लीक)
- 120 हर्ट्झ फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2
- 108 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
- 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 33 वॉट 4,900 एमएएच बॅटरी
डिझाईन : लीकनुसार हा फोन जुन्या लुमिया फोनसारखी ‘Fabula’ डिझाईनवर सादर केला जाईल. म्हणजे मोबाईलचा लूक ओरिजनल Nokia Lumia सारखा असेल. या फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स दिले जाणार असल्याची गोष्ट पण लीकमध्ये समोर आली आहे.
डिस्प्ले : अगामी HMD Lumia फोनला फुलएचडी+ रेजोल्यूशन असणाऱ्या पंच-होल डिस्प्लेवर लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार या फोनमध्ये AMOLED पॅनल स्क्रीनचा वापर केला जाईल जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल.
प्रोसेसर : नवीन लुमिया फोन अँड्रॉईड 14 ओएससह मार्केटमध्ये आणला जाईल. तसेच लीकनुसार या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7s Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल जो 2.4GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर प्रोसेस करेल.
बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर दिली जाईल जी 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सरसह मिळून काम करेल.
फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे तसेच रिल्स बनविण्यासाठी या अगामी HMD Lumia फोनमध्ये 32MP Selfie Camera सेन्सर पहायला मिळू शकतो.
बॅटरी : लीकनुसार हा मोबाईल फोन 4,900 एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये एंट्री घेईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण दिली जाऊ शकते.
इतर फिचर्स : एचएमडी लुमिया स्मार्टफोन NFC आणि Bluetooth 5.2 सारख्या फिचर्ससह असेल. तसेच लीकमध्ये समोर आले आहे की हा मोबाईल PureView आणि OZO audio सपोर्टेड असेल.














