कामालाच झाली! 108MP Camera असलेला Moto G72 भारतात लाँच; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

108-Megapixel Camera Phone Motorola Moto G72 Launched In India Price Rs 14999 Sale Flipkart

108 MP Camera Phone Moto G72 Launch: Motorola नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात 200MP चा कॅमेरा असलेला स्मरफोन सादर करून विक्रम केला होता. या फोनच्या माध्यमातून कंपनीनं प्रीमियम ग्राहकांना आकर्षित केलं होतं परंतु आता मिडरेंजमधील ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनीनं भारतात नवीन Mobile Phone Moto G72 लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की हा भारतातील पहिला बिलियन 10 बिट 120 हर्ट्ज पीओएलईडी डिस्प्लेसह येणारा फोन आहे. यात एक दमदार व्यूइंग एक्सपीरिसंय मिळतो. दोन कलर व्हेरिएंटमध्ये आलेला हा Smartphone मीडियाटेक हेलियो जी 99 चिपसेटवर चालतो.

Moto G72 ची डिजाइन

Motorola Moto G72 ची डिजाइन पाहता फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, तर फ्रंटला एक पंच होलचा वापर करण्यात आला आहे. Moto G72 च्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. हा फोन कंपनीनं दोन कलर ऑप्शन Meteorite Grey आणि Polar Blue मध्ये सादर केला आहे. हे देखील वाचा: 15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप

108 Megapixel Camera Phone Motorola Moto G72 India Launch On 3 October

Moto G72 Specifications

मोटोरोला मोटो जी72 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा पीओएलईडी पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 576हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते ज्यात 1300निट्स ब्राइटनेस, डीसीआई पी3 कलर गामुट आणि एचडीआर 10 सपोर्ट मिळतो.

108 Megapixel Camera Phone Motorola Moto G72 India Launch On 3 October

Moto G72 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपेसटवर चालतो. भारतीय बाजारात मोटो जी72 स्मार्टफोन 6GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 storage सह आला आहे. मोटो जी72 आयपी52 रेटिंगसह आला आहे, त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून याची सुरक्षा होते. यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ऑडियो टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

108-Megapixel Camera Phone Motorola Moto G72 Launched In India Price Rs 14999 Sale Flipkart

फोटोग्राफीसाठी मोटो जी72 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात प्रायमरी सेन्सर f/1.7 अपर्चरसह 108 मेगापिक्सलचा आहे. जोडीला बॅक पॅनलवर f/2.2 अपर्चरसह 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि f/2.4 अपर्चरसह 2 MP चा एक मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.45 अपर्चरसह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर पावर बॅकअपसाठी Moto G72 मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: भारतात लाँच झाली सर्वात जास्त रेंज देणारी Electric Car, किंमत आहे इतकी…

Moto G72 ची प्राइस आणि सेल

मोटो जी72 स्मार्टफोन कंपनीनं 18,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. परंतु मर्यादित कालावधीसाठी लाँच ऑफर अंतर्गत हा फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ह्याची विक्री 12 ऑक्टोबर दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर केली जाईल. तसेच जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 3000 रुपये तर निवडक बँकेच्या कार्ड्सवर 1000 रुपयांची तात्कळ सूट मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here