लावाने भारतीय युजर्ससाठी एक आणि 5 जी स्मार्टफोन पर्याय दिला आहे हा Lava Yuva 5G नावाने लाँच झाला आहे. ब्रँडने फोनसाठी आता युवा बनेगा 5G टॅगलाईनचा वापर केला आहे. यात व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीसह 8 जीबी रॅम, 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले सारखे अनेक स्पेसिफिकेशन मिळत आहेत. चला, पुढे किंमत आणि फिचर्सची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया.
Lava Yuva 5G ची किंमत आणि उपलब्धता
- लावा युवा 5G स्मार्टफोनला दोन स्टोरेज पर्यायामध्ये एंट्री देण्यात आली आहे.
- मोबाईलच्या 4GB रॅम +64GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 9,499 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंट 4GB रॅम +128GB ऑप्शन 9,999 रुपयांचा आहे.
- कलर ऑप्शन पाहता स्मार्टफोन मिस्टेक ग्रीन आणि मिस्टेक ब्लू सारखे दोन कलरमध्ये उपलब्ध होईल.
- Lava Yuva 5G ला युजर्स येत्या 5 जूनपासून अॅमेझॉन, लावा ई-स्टोर आणि इतर रिटेल आऊटलेटवरून खरेदी करू शकता.
Lava Yuva 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Lava Yuva 5G मोबाईलमध्ये 6.52-इंचाची एलसीडी HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. यावर 720×1600 पिक्सल रिजॉल्यूशन, 269ppi पिक्सल डेंसिटी, 90Hz रिफ्रेश रेट, 2.5D कर्व्ड ग्लास, आणि पंच-होल डिझाईन नॉच मिळत आहे.
- प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये चांगल्या परफॉरमेंससाठी UniSoC T750 चिपसेट देण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली G57 GPU आहे.
- मेमरी: स्टोरेजच्या बाबतीत हा फोन 4GB RAM, 4GB व्हर्च्युअल RAM आणि 64GB तसेच 128GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट पण आहे.
- कॅमेरा: Lava Yuva 5G फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा इतर सेन्सर LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. तसेच, फ्रंटला स्क्रीन फ्लॅशसह 8MP लेन्स आहे.
- बॅटरी: डिव्हाईसला चालवण्यासाठी Lava Yuva 5G मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 18W फास्ट चार्जिंग मिळते.
- इतर: फोनमध्ये फेस अनलॉक, साईड फिंगरप्रिंट सेन्सर, ऑडियोसाठी 3.5mm ऑडियो जॅक, ड्युअल-सिम, 5G, WiFi 5 802.11 ac, ब्लूटूथ 5.0 सारखे पर्याय मिळतात.
- वजन आणि डायमेंशन: Lava Yuva 5G फोन 163.36 × 76.16 × 9.1mm आणि 208 ग्रॅम आहे.
- ऑपरेटिंग सिस्टम: मोबाईल Android 13 सह लाँच झाला आहे ज्याला 14 अपग्रेडसह दोन वर्षाचे सुरक्षा अपडेट मिळतील.
















