500KM च्या रेंजसह येऊ शकते Maruti Electric Car; Auto Expo 2023 मध्ये होऊ शकते सादर

भारतातील लोकप्रिय कार मॅन्युफॅक्चरर Maruti Suzuki India Limited नं अखेरीस इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये पदार्पण करण्याची तयारी दर्शवली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार कंपनी पुढील वर्षी होणाऱ्या Auto Expo 2023 मध्ये Maruti Ev सादर करेल जी एक SUV असेल. या कारचा आकार भारतातील Hyundai Creta इतका असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. या नवीन EV ची बातमी भारतीय बाजारातील Tata Ev आणि MG Ev साठी धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच रिपोर्ट्सनुसार मारुती EV सिंगल चार्जमध्ये 500km पर्यंत चालवता येऊ शकते.

ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) ची उलटमोजणी सुरु झाली आहे. अनेक बड्या ऑटो कंपन्या यावेळी सहभाग घेणार नाहीत, त्यामुळे ऑटो एक्सपो थोडा फिका वाटू शकतो. परंतु आता पुढील वर्षीच्या ऑटो एक्सपो ऑटो एक्सपो संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ऑटो एक्सपो पूर्वी देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीनं घोषणा केली आहे की, कंपनी एक्सपोमध्ये एक Electric Concept SUV आणि दोन all-new SUVs चा ग्लोबल प्रीमियर करेल. मारुती सुजुकीच्या या घोषणेनंतर ऑटो सेक्टरमध्ये खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा: छोटंसं काम करून मोफत मिळवा पारदर्शक लुक असलेला Nothing Phone 1; जाणून घ्या माहिती

Maruti Suzuki EV

Autocar India नं माहिती दिली आहे की Maruti Suzuki India Limited आपली पहिली ऑल इलेक्ट्रिक कॉम्पेक्ट एसयूव्ही Auto Expo 2023 दरम्यान सादर करू शकते. मॉडेल कंपनीच्या सर्व नवीन इलेक्ट्रिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरचा प्रीव्यू करू शकतो आणि टोयोटासह मिळून बनवला जाऊ शकतो. टोयोटा देखील नंतर आपल्या बॅनर अंतर्गत हा प्रोडक्ट सादर करू शकते.

नवीन EV चं कोडनेम YY8 आहे आणि ही SUV 27PL प्लॅटफॉर्मवर बनू शकतो. तसेच Maruti ची ही इलेक्ट्रिक कार 13 ते 15 लाखांच्या बजेटमध्ये सादर केली जाऊ शकते. जर या किंमतीत ही ई-कार आली तर ही एक पैसा वसूल कार ठरू शकते. ही YY8 SUV भारतीय बाजरातील MG ZS EVz च्या आकाराची असू शकते आणि हिची रेंज Tata Nexon EV Prime च्या आसपास असू शकते. तसेच ही ई-कार January-February 2025 पर्यंत मार्केटमध्ये सादर केली जाऊ शकते. हे देखील वाचा: विवोचा स्वस्तात मस्त मोबाइल फोन लाँचसाठी तयार; ‘वाय’ सीरीजमधील नव्या मॉडेलची माहिती लीक

ऑटो एक्सपोमध्ये येऊ शकतात मारुतीचे 16 मॉडेल्स

मारुती सुजुकी एक्सपो मध्ये 16 वाहनांची एक सीरीज प्रदर्शनास ठेऊ शकते, ज्यात एक इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही, दोन नवीन एसयूव्ही, WagonR Flex Fuel, Grand Vitara, XL6, Ciaz, Ertiga, Brezza, Baleno आणि Swift सारख्या मॉडेल्सचा समावेश असू शकतो. मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, हिसाशी टेकूची यांनी म्हटलं आहे की, “चार दशकांपासून अधिक काळ वाहन निर्माण करणारी कंपनी यावेळी ग्राहकांसाठी काही नवीन घेऊन येत आहे. जे लोकांच्या गरजेसाठी खूप चांगलं आहे. आम्हाला विश्वास आहे की आमचे सर्व नवीन एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक ईव्ही, हायब्रीड, फ्लेक्स-फ्यूल प्रोटोटाइप सारखे मॉडेल लोकांना आवडतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here