Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip या महिन्यात होणार लाँच, ब्रँडने केले कंफर्म

शाओमीचे खूप चर्चेत असलेले फोल्ड होणारे स्मार्टफोन Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ब्रँडने घोषणा केली आहे की हा डिव्हाईस या महिन्यात सादर केला जाईल. याला घेऊन नवीन टिझर पोस्टर शेअर करण्यात आला आहे. ज्यात फोनचे चीनमध्ये लाँच आणि इतर माहिती सांगण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रँड Redmi K70 Ultra पण जुलैमध्ये सादर करू शकतो. ज्याची पुष्टी अजून झालेली नाही. चला, शाओमी मिक्स फोल्ड 4 आणि फ्लिप बाबत सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip लाँच कंफर्म

  • Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip मोबाईलबद्दल ब्रँडने मायक्रो ब्लॉग्गिंग साईट वीबोवर माहिती दिली आहे.
  • तुम्ही खाली टिझरमध्ये पाहू शकता की दोन्ही मोबाईलला या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे.
  • ब्रँडनुसार नवीन फॅक्ट्रीने अधिकृत स्तरावर मोठे उत्पादन सुरु केले आहे.
  • कंपनीने नवीन प्रॉडक्ट्स बनविण्यासाठी आपल्या नवीन फॅक्ट्रीला रिसर्च सह तयार केले आहे. ज्यात नवीन स्मार्ट टेक्नॉलॉजीसह डिव्हाईस बनविला जाईल.
  • नवीन सुविधांच्या मदतीने अगामी मिक्स फोल्ड 4 आणि मिक्स फ्लिप फोल्डेबल स्मार्टफोनचे निर्माण होईल.

Xiaomi Mix Fold 4 आणि Xiaomi Mix Flip स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • Xiaomi Mix Fold 4 आणि Mix Flip मध्ये परफॉरमेंससाठी Snapdragon 8 Gen 3 चिपसेट लावला जाऊ शकतो.
  • Xiaomi Mix Flip चार स्टोरेज पर्यायांमध्ये सादर होऊ शकतो. ज्यात 12GB रॅम +256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • Mix Flip मध्ये 4 इंचाचा आऊटर डिस्प्ले मिळण्याची चर्चा आहे. तर इनर स्क्रीन साईजची माहिती मिळाली नाही.
  • Xiaomi Mix Flip मध्ये OIS ला सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 60 मेगापिक्सलचा 2x टेलीफोटो ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.
  • चार्जिंगच्या बाबतीत Xiaomi Mix Flip 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असू शकतो.
  • Xiaomi Mix Fold 4 पाहता यात OIS ला सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स, 2x ऑप्टिकल झूम असलेला 60 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूम असलेला 10 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो.
  • शाओमी मिक्स फोल्ड 4 ची बॅटरी साईज 5,000mAh असू शकते. यात 67W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंग पण दिली जाऊ शकते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here