या स्मार्टफोनच्या बजेटवर जाऊ नका; जबरदस्त गेमिंग प्रोसेसरसह Poco X5 GT येणार

Highlights

  • Poco X5 GT स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर स्पॉट करण्यात आला आहे.
  • या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर 23049PCD8I आहे.
  • हा डिवाइस लवकरच भारतात लाँच होईल.

Poco नं आपल्या Poco X5 स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Poco X5 आणि Poco X5 Pro 5G हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केले आहेत. आता कंपनी या सीरीजमध्ये आणखी डिवाइसचा समावेश करणार असल्याचं बातमी आली आहे. पोकोच्या लोकप्रिय एक्स सीरिजमधील आगामी Poco X5 GT स्मार्टफोन अलीकडेच Bureau of Indian Standards म्हणजे BIS वर दिसला आहे. ही एक भारतीय सर्टिफिकेशन साईट असल्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की हा फोन लवकरच भारतीय बाजारात येईल.

Poco X5 GT चा भारतीय लाँच

गिज्मोचायनाच्या रिपोर्टनुसार, Poco X5 GT फोन BIS वर मॉडेल नंबर 23049PCD8I सह लिस्ट झाला आहे. लिस्टिंगमधून स्मार्टफोन फीचर किंवा स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही. परंतु लिस्टिंगमधून भारतात लवकरच पोको एक्स 5 जीटी पाहायला मिळणार हे कन्फर्म झालं आहे. काही मीडिया रिपोर्टमनुसार पोको एक्स 5 जीटी स्मार्टफोन Redmi Note 12 Turbo चा रिब्रँडेड व्हर्जन देखील असू शकतो.

Poco X5 GT चे संभाव्य स्पेसिफिकेशन

पोको एक्स5 जीटीमध्ये 6.67-इंचाचा मोठा ओएलईडी डिस्प्ले दिला जाईल, ज्याचं रिजोल्यूशन फुल एचडी+ आणि रिफ्रेश रेट 120Hz असेल. या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 जेन 2 चिपसेट दिला जाईल, जो अजून लाँचही झाला नाही. त्याचबरोबर यात 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळेल. हे देखील वाचा: या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी संधी पुन्हा नाही

या स्मार्टफोनमध्ये Redmi Note 12 Pro सारखा कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता जास्त आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP च्या मॅक्रो लेन्सचा समावेश असेल. फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआऊट असेल ज्यात 16MP चा सेल्फी शुटर दिला जाईल. पॊको एक्स5 जीटीमध्ये 5500mAh ची अवाढव्य बॅटरी मिळेल जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येईल.

POCO X5 Pro 5G Specifications

  • 6.67″ FHD+ AMOLED Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 778G
  • 108MP Triple Rear Camera
  • 67W 5,000mAh Battery

पोको एक्स5 प्रो 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच-होल स्टाईल अ‍ॅमोलेड पॅनल स्क्रीनला कंपनीनं एक्सफिनिटी डिस्प्ले असं नाव दिलं आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोन स्क्रीन 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते.

POCO X5 Pro 5G फोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 येतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 642एल जीपीयू आहे. हा फोन LPDDR4X RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वनप्लसच्या तोडीचा Samsung फोन लाँचसाठी तयार; Galaxy A54 5G वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी पोको एक्स5 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 108MP ISOCELL HM2 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा पोको फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

POCO X5 Pro 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन 12 लेयर वाले ग्रॅफाइट कूलिंग सिस्टमसह येतो जी गेमिंग दरम्यान फोनला थंड ठेवते. हा फोन आयपी53 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून डिवाइस सुरक्षित राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here