प्रीमियम डिझाईन असलेला Samsung Galaxy Z Fold 6 लाँच, यात आहे 12 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज

फोल्डेबल फोनचा विचार केल्यास सॅमसंगवर सर्वाधिक विश्वास ठेवला जातो. आज, कंपनीने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनचे नवीन जनरेशन Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 हे भारतात लाँच केले आहेत. Flip 6 बद्दलची माहिती येथे क्लिक करून वाचता येईल आणि Fold 6 चे तपशील आपण पुढे जाणून घेऊ शकता.

Samsung Galaxy Z Fold 6 ची किंमत

  • 12GB रॅम + 256GB स्टोरेज – 164,999 रुपये
  • 12GB रॅम + 512GB स्टोरेज – 176,999 रुपये
  • 12GB रॅम + 1TB स्टोरेज – 200,999 रुपये

Samsung Galaxy Z Fold 6 भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरियंट्समध्ये आला आहे. यात 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी स्टोरेज आहे आणि हे तिन्ही मॉडेल 12 जीबी रॅमला सपोर्ट करतात. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हे व्हेरियंट्स अनुक्रमे 164,999 रुपये, 176,999 रुपये आणि 200,999 रुपये किमतीला लाँच केले गेले आहेत.

  • Galaxy Z Fold 6 वरही उत्तम ऑफर आणल्या गेल्या आहेत. एक्सचेंजवर जुन्या सॅमसंग फ्लॅगशिप फोनच्या बदल्यात कंपनी 15,000 रुपयांचा फायदा देत आहे.
  • सॅमसंग अपग्रेड स्कीम अंतर्गत यूजर्स 8000 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकतात. तसेच या पर्यायात बँक कार्डवर 8000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. ग्राहकांना या दोनपैकी फक्त एका योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • 999 रुपये जादा भरून 14,999 रुपयांच्या रिप्लेसमेंट पॅकचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये फोन डिस्प्ले किंवा मोबाईलचा कोणताही भाग वर्षातून दोनदा मोफत बदलता येतो.
  • Samsung Galaxy Z Flip 6 हा 9 महिने विनाशुल्क ईएमआय वर देखील खरेदी केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy Z Fold 6 चे डिझाईन

Samsung Galaxy Z Fold 6 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे खास डिझाईन होय. हा फोल्डेबल फोन प्रीमियम दर्जाचा लुक देतो. कंपनीकडून हा मोबाईल आर्मर ॲल्युमिनियम 2 फ्रेमवर तयार करण्यात आला आहे. ज्याची मुख्य स्क्रीन आणि कव्हर डिस्प्ले दोन्ही कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 ने संरक्षित आहेत. सॅमसंगच्या मते हा Galaxy ‘Z’ सीरीज मधील सर्वात टिकाऊ स्मार्टफोन आहे.

Galaxy Z Fold 6 चे फोल्ड केल्यानंतर डायमेन्शन 68.1 x 153.5 x 12.1 एमएम आणि अनफोल्ड केल्यानंतर ते 132.6 x 153.5 x 5.6 एमएम होते. या मोबाईलचे वजन 239 ग्रॅम आहे. हा सॅमसंग फोल्ड फोन सिल्व्हर शॅडो, पिंक आणि नेव्ही कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी केल्यावर, तो क्राफ्टेड ब्लॅक आणि व्हाईट कलर या मॉडेल्समध्ये देखील उपलब्ध होईल.

Samsung Galaxy Z Fold 6 ची स्क्रीन

मुख्य डिस्प्ले
Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन दिली गेली आहे. हा 2160 x 1856 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला QXGA+ डिस्प्ले आहे जो Dynamic AMOLED 2X पॅनलवर बनवला आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600nits ब्राईटनेस वर काम करतो. सॅमसंगने याला इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले असे नाव दिले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की फोन उघडल्यानंतर त्याची स्क्रीन आस्पेक्ट रेशो 20.9:18 होईल.

कव्हर डिस्प्ले
Galaxy Z Fold 6 फोल्ड केल्यानंतर 6.3 इंचाची कव्हर स्क्रीन समोर येते याला सेकंडरी डिस्प्ले असेही म्हणता येईल. हा देखील Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 22.1:9 आस्पेक्ट रेशोवर बनवला आहे आणि 2376 x 968 HD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. चांगली गोष्ट म्हणजे यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600nits ब्राईटनेस देखील मिळत आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 चा कॅमेरा

बॅक कॅमेरा
Samsung Galaxy Z Fold 6 5G फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सेलचा वाईड कॅमेरा दिला गेला आहे ज्यामध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा तसेच 3X ऑप्टिकल झूम आणि एफ/2.4 अपर्चरसह 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा बॅक कॅमेरा 36˚ ते 123˚ FOV ला सपोर्ट करतो आणि हा OIS, Dual Pixel AF आणि PDAF सारख्या फीचर्सने सुसज्ज आहे.

फ्रंट कॅमेरा
Galaxy Z Fold 6 मध्ये दोन फ्रंट कॅमेरे दिले गेले आहेत. यातील एक सेन्सर जिथे फोन फोल्ड केल्यावर समोर येतो, तर दुसरा सेल्फी कॅमेरा मोबाईलच्या मुख्य स्क्रीनच्या आत लावण्यात आला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा कॅमेरा प्रायमरी डिस्प्लेच्या आत लावला आहे जो बाहेरून दिसत नाही. हा 4 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे जो एफ/1.8 अपर्चरवर काम करतो. तसेच त्याच्या कव्हर स्क्रीनवर एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 चे परफॉर्मन्स

Samsung Galaxy Z Fold 6 5G फोन अँड्रॉइड 14 वर लाँच करण्यात आला आहे जो One UI 6.1.1 सोबत मिळून काम करतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेला Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2.3 गीगाहर्ट्झ पासून ते 3.3 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करतो.

हा प्रोसेसर AI तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जो केवळ एकंदरीत परफॉर्मन्स सुधारण्यासोबतच ग्राफिक्स देखील चांगले बनवतो. तसेच फोनमध्ये अपग्रेडेड व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम देखील आहे. Samsung Galaxy Z Fold 6 हा 12GB रॅमला सपोर्ट करतो. भारतीय बाजारपेठेत हा मोबाईल 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी स्टोरेज पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy Z Fold 6 ची बॅटरी

Samsung Galaxy Z Fold 6 5G स्मार्टफोन पॉवर बॅकअपसाठी 4,400mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो. बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा मोबाईल 30 मिनिटांत मोबाईल 50 टक्के चार्ज करता येऊ शकतो. Galaxy Z Fold 6 मध्ये वापरकर्त्यांना फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 तंत्रज्ञान देखील मिळेल.

Samsung Galaxy Z Fold 6 चे फिचर्स

  • Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोन IP48 प्रमाणित आहे जो पाणी आणि धूळ यांच्यापासून त्याचे संरक्षण करतो.
  • कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G आणि LTE सोबत Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.3 मिळत आहे.
  • सुरक्षेसाठी यामध्ये फेस अनलॉक फीचर आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • गोपनीयता मजबूत करण्यासाठी Z Fold 6 ला Samsung Knox आणि Samsung Knox Vault ने सुसज्ज करण्यात आले आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here